Take a fresh look at your lifestyle.

आणि पोलार्डने उडवला बॉलरच्या चेहऱ्याचा रंगच; मैदानात प्रेक्षक आणि खेळाडूही झाले की स्तब्ध..!

मुंबई :
आयपीएल २०२१ च्या ९ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा तडाखेबंद फलंदाज किरोन पोलार्डने आयपीएल २०२१ मधील सर्वात लांब षटकार ठोकला आहे. हैदराबादविरुध्दच्या सामन्यात त्याने हा पराक्रम केला असून अफगाणिस्तानचा फिरकीपटू मुजीब उर रहमानने केलेल्या १७ व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर पोलार्डने हा षटकार मारला.

Advertisement

पोलार्डने मारलेला षटकार इतका लांब होता की चेंडू स्टेडियमच्या बाहेर गेला. पोलार्डने मारलेला हा सिक्सर १०५ मीटर लांबीचा होता. पोलार्डने मुजीबच्या चेंडूचा अंदाज लावला आणि मग त्याने हा षटकार लगावला. खरं तर, मुजीबने शॉर्ट बॉल फेकला, त्याचा फायदा स्फोटक फलंदाज पोलार्डने घेतला आणि या आयपीएलमधील सर्वात लांब षटकार ठोकला. हा षटकार पाहून गोलंदाज मुजीबच्या चेहऱ्याचा रंगच उडाला.

Advertisement

AK #MI💙 on Twitter: “KIERON POLLARD with the 105M six. That deserved more than 6 runs tbh🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥 #MIvsSRH https://t.co/KjUNvihxyI” / Twitter

Advertisement

दरम्यान, पोलार्डचा हा षटकार पाहून मुंबईचे खेळाडू डगआऊटमध्ये बसून स्तब्ध झाले, विशेषत: पियुष चावलाची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती. वेस्ट इंडिजच्या फलंदाजाची ही कामगिरी पाहून चावला आश्चर्यचकित झालेला दिसला. पोलार्डच्या आधी या आयपीएलमधील सर्वात मोठा षटकार मॅक्सवेलने मारला होता. मॅक्सवेलने मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात १०० मीटर लांब सिक्सर मारला होता. याशिवाय केकेएविरुद्ध ९९ मीटर लांब सिक्सर सूर्यकुमार यादवने मारला होता. तसेच मनीष पांडेने या हंगामात आरसीबीच्या विरोधात ९६ मीटर लांब षटकार मारला आहे.

Advertisement

पोलार्डने आयपीएलमध्ये २०० षटकारही पूर्ण केले आहेत. पोलार्डने आतापर्यंत आयपीएलमध्ये २०१ षटकार मारले आहेत. आता पोलार्डने विराट कोहलीशी बरोबरी केली असून आयपीएलमध्ये कोहलीने आतापर्यंत २०१ षटकार ठोकले आहेत. याशिवाय आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून २०० षटकार ठोकणारा पोलार्ड हा पहिला फलंदाज ठरला आहे.
संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply