Take a fresh look at your lifestyle.

क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांनाही झाली कोरोनाची बाधा

दिल्ली :
भारताचे क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांना कोरोनाची बाधा झाली असून याबद्दल त्यांनी आपल्या ट्विटरवरुन माहिती दिली आहे. त्यांनी लिहिले आहे की, सतत केलेल्या कोरोना टेस्टनंतर त्यांचा अहवाल आज सकारात्मक आला. त्यांनी डॉक्टरांकडून सल्ला घेतला असून शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असल्याचे त्यांनी सांगितले आहे. किरेन रिजिजू यांनी आपल्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांना अलर्ट केले असून अलग राहण्याचे आवाहन केले आहे.

Advertisement

Kiren Rijiju on Twitter: “After getting repeated test for Covid-19, today my report has come out positive. I’m taking the advice of the Doctors. I request all those who have come in my contact recently to be observant, exercise self-quarantine and get themselves tested. I’m physically fit and fine.” / Twitter

Advertisement

भारतात कोरोनाच्या केसेस झपाट्याने वाढत आहेत आणि दररोज २ लाखांहून अधिक लोक कोरोनाबाधित सापडत आहेत. काही दिवसांपुर्वी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर देखील कोविड पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आणि नंतर त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले होते. सचिन व्यतिरिक्त, युसूफ पठाण आणि इतर अनेक खेळाडू देखील या विषाणूचा बळी पडले आहेत. भारतीय खेळाडू यावर्षी ऑलिम्पिकमध्ये भाग घेणार आहेत, परंतु कोरोनाच्या वाढत्या केसेस लक्षात घेता आता टोकियो ऑलिम्पिकदेखील धोक्यात आली आहे.

Advertisement

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शनिवारी व रविवारी देशाच्या अनेक भागात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. त्याचबरोबर लोकांना घराबाहेर न जावू देण्याचा सल्ला देण्यात आला आहे. उत्तर प्रदेशमध्येही रविवारी संपूर्ण लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. दिल्ली आणि महाराष्ट्रात कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढत असून देशाच्या राजधानीत गेल्या आठवड्याच्या तुलनेत प्रकरणे दुपटीने वाढली आहेत. 
संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply