Take a fresh look at your lifestyle.

अहमदनगर सर्वेक्षण : अशी आहे विकासकामाबाबतची कॉमन भावना; पहा कोण आहे विकाससम्राट..!

अहमदनगर :

Advertisement

‘अहमदनगर जिल्हा राजकीय – सामाजिक सर्वेक्षण 2021’च्या आजच्या भागात आपण ग्रामीण भागातील जनतेची विकासाबाबतची नेमकी भावना काय आहे हे पाहणार आहोत. सर्वेक्षणात अनेकांनी आपली भावना मनमोकळेपणाने व्यक्त केली आहे. काहींनी तर संताप व्यक्त करताना पातळी सोडली आहे. त्यामुळे आम्ही त्यातील आशय लक्षात घेऊन या विश्लेषण अहवालाची मांडणी केली आहे. एकूण विकासाच्या दृष्टीकोनाबाबत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी नापास असल्याचीच भावना व्यक्त झालेली आहे.

Advertisement

अगोदरच प्रसिद्ध झालेले ‘अहमदनगर सर्वेक्षण’ लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा : www.krushirang.com/tag/survey/

Advertisement

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्याकडून विकासाला हातभार लावण्याचे ठोस कार्यक्रम राबवले जात नसल्याची भावना आहे. तसेच आपल्या भागातील विकास कोणी केला, या प्रश्नावरही अनेकांनी आतापर्यंत झालेला विकास सर्वांगीण (जो काही विकास झालेला असेल ते) असल्याचे म्हटलेले आहे. एकच कोणी विकाससम्राट किंवा कार्यसम्राट असल्याची भावना कोणत्याही तालुक्यातील जनतेने व्यक्त केलेली नाही. (तालुका व विधानसभा मतदारसंघनिहाय विश्लेषण पुढील लेखात आपणास वाचायला मिळणार आहे) याबाबत सर्वेक्षणातील सहभागी व्यक्तींनी दिलेले उत्तर असे :

Advertisement
लोकप्रतिनिधी पदाचे नावविकासातील टक्केवारी
स्थानिक सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती व माजी पदाधिकारी26.6
आमदार25.1
जिल्हा परिषद सदस्य21.9
सरपंच14.3
खासदार7.1
पंचायत समिती सदस्य1.9 
साखर कारखाना व सहकारी संस्था3.1

जिल्ह्यातील खासदारांच्या कामाबाबत खूप मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. तर, शहर आणि ग्रामीण भागात विकासाला गती देण्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे. उत्तर नगरचे खासदार सदाशिवराव लोखंडे यांनी खूपच कमी कामे केल्याचे नागरिकांचे मत आहे. तर, नाराजी असतानाही दक्षिण नगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्याबाबत तुलनेने बरी भावना दिसते. मात्र, तरीही त्यांच्याबाबतची नाराजीची टक्केवारी जास्तच आहे.

Advertisement

‘आपल्या भागात कोणती विकासकामे झाली’, या प्रश्नावर युझर्सने आपली भावना व्यक्त केली आहे. यात कोणतेही ठोस विकास काम झालेले नसल्याची भावना तब्बल 31 टक्के लोकांनी व्यक्त केली आहे. तर, रस्ते आणि पाणी या कामांकडे लक्ष देणाऱ्या लोकप्रतिनिधींनी करोनाच्या संकटातही आरोग्याचा प्रश्न वंचित ठेवल्याची भावना नगरकरांची आहे. आरोग्याबाबत कोणतेही काम झालेले नसून, खासगी आरोग्य यंत्रणा मोठ्या प्रमाणात लुट करीत आहे. तर, सरकारी यंत्रणा अजिबात सहकार्य करीत नसल्याचे म्हटलेले आहे. त्याबाबतचा गोषवारा असा :

Advertisement
विकासाचा मुद्दाटक्केवारी
कोणतेही विकासकाम झालेले नाही31.0
रस्ते44.8
पाणी10.3
बांधकामे6.9
शेती योजना3.4
इतर योजना3.4
आरोग्य0.0

गावोगावी सभामंडप आणि धार्मिक स्थळांना मदत करताना आरोग्य व पाणी या मुद्द्यांकडे आमदार, खसरा, जिल्हा परिषद व पंचायत समितीने स्पष्ट दुर्लक्ष केल्याची भावना नगरकरांची आहे. आताही अनेक आमदार फ़क़्त चमकोगिरी करीत असून ठोस मुद्दे नाही तर गावोगावच्या टोळ्यांद्वारे राजकारण केले जात असल्याचा मुद्दाही काही तरुणांनी उपस्थित केलेला आहे. चांगला पर्यायी उमेदवार नसल्याने आहे त्यातच दगडापेक्षा वीट मऊ असलेल्या उमेदवाराला मतदान करावे लागत आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कोणताही राजकीय पक्ष काम करीत नसून बाजार समित्या फ़क़्त शेतकऱ्यांची लुट करतात, अशीही भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.

Advertisement

 संपादन : सचिन मोहन चोभे (क्रमशः)

Advertisement

पुढील विश्लेषण प्रसिद्ध होण्याचे वेळापत्रक असे :

Advertisement
सर्वेक्षणाच्या विश्लेषणातील बातमीचा विषयप्रकाशित होण्याचा संभाव्य दिनांक
जिल्ह्यातील विकास कामाबाबतची भावनादि. 18 एप्रिल 2021
शहरी भाग (महापालिका / नगरपालिका) कामाबाबत मुद्देदि. 19 एप्रिल 2021
विधानसभा मतदारसंघ : अकोलेदि. 20 एप्रिल 2021
विधानसभा मतदारसंघ : कोपरगावदि. 21 एप्रिल 2021
विधानसभा मतदारसंघ : संगमनेरदि. 22 एप्रिल 2021
विधानसभा मतदारसंघ : शिर्डी (राहता)दि. 23 एप्रिल 2021
विधानसभा मतदारसंघ : श्रीरामपूरदि. 24 एप्रिल 2021
विधानसभा मतदारसंघ : नेवासादि. 25 एप्रिल 2021
विधानसभा मतदारसंघ : राहुरीदि. 26 एप्रिल 2021
विधानसभा मतदारसंघ : शेवगाव-पाथर्डीदि. 27 एप्रिल 2021
विधानसभा मतदारसंघ : कर्जत-जामखेडदि. 28 एप्रिल 2021
विधानसभा मतदारसंघ : श्रीगोंदादि. 29 एप्रिल 2021
विधानसभा मतदारसंघ : पारनेरदि. 30 एप्रिल 2021
विधानसभा मतदारसंघ : अहमदनगर शहरदि. 1 मे 2021
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply