Take a fresh look at your lifestyle.

म्हणून रात्री झोपण्याअगोदर प्यायचा असतो गुळ; पहा कोणते फायदे होतात या सध्या गोष्टीमुळे

आपल्यालाही अॅसिडिटी व पचन न होण्याची समस्या असल्यास किंवा आपल्याला हाडांमध्ये वेदना असल्यास रात्री झोपायच्या आधी कोमट दुधात गूळ टाकून प्या. या रेसिपीचे असे बरेच फायदे आहेत हे जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

Advertisement

जेव्हा मिठाईचा विचार केला जातो तेव्हा आपल्या सर्वांना हे माहित आहे की गूळ साखरपेक्षा जास्त फायदेशीर मानला जातो. पांढऱ्या साखरेचे सेवन केल्यास अनेक आजार होतात, असे अनेक हेल्थ अभ्यासक सांगतात. त्याचवेळी गूळ आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर मानला जातो. गुळ खाणे रोगप्रतिकारक प्रणालीत (इम्युनिटी) चांगले असते. तसेच अशक्तपणा कमी होतो. यासह गुळ हा यकृत डिटोक्समध्येही उपयोगी आहे.

Advertisement

अशा परिस्थितीत जर तुम्ही रात्री झोपायच्या आधी दुधामध्ये गूळ टाकून पिलात तर तुमच्या आरोग्याशी संबंधित बर्‍याच समस्या दूर होऊ शकतात. दूध कॅल्शियम आणि प्रथिने याचा एक उत्कृष्ट स्त्रोत आहे. गुळामध्ये कॅल्शियम व्यतिरिक्त लोह आणि फॉस्फरस यासारख्या अनेक पोषक द्रव्यांचा समावेश असतो. जो शरीरासाठी खूप महत्वाचा असतो. गुळापासून होणारे फायदे खालीलप्रमाणे आहेत :

Advertisement

1. बद्धकोष्ठतेची समस्या दूर होईल : जर सकाळी पोट साफ होत नसेल. तर रात्री झोपायच्या आधी कोमट दुधात गूळ प्या. गुळामध्ये भरपूर फायबर असतात जेणेकरून तुमची पाचक प्रणाली अधिक चांगले कार्य करेल आणि आपल्याला बद्धकोष्ठता आणि पोट साफ न होण्याच्या समस्यांपासून मुक्तता मिळेल.

Advertisement

२. सांधेदुखीचा त्रास दूर होईल : जसे आपण आधीच सांगितले आहे की दूध आणि गूळ या दोन्हीमध्ये कॅल्शियम असते आणि हाडे मजबूत करण्यासाठी कॅल्शियम खूप महत्वाचे आहे. तुम्हाला सांधेदुखी या समस्येचाही त्रास होत असेल तर रात्री झोपायच्या आधी दुधाबरोबर गूळ खाण्यास सुरवात करा.

Advertisement

३. वजन कमी करण्यास उपयुक्त : जर तुम्हाला साधे दूध पिणे आवडत नसेल तर दुधात साखरेऐवजी गूळ घालायला सुरुवात करा. साखर वजन वाढवण्यासाठी कार्य करते तर गूळात बरीच संयुगे असतात ज्याची चरबी जाळण्यास मदत होते. गूळ आणि दूध एकत्र घेतल्याने चयापचय देखील सुधारतो.

Advertisement

४. अशक्तपणापासून बचाव : गुळामध्ये लोह तसेच जस्त असते. जे रक्तातील हिमोग्लोबिन वाढविण्याचे कार्य करते. अशक्तपणासारख्या आजारांना टाळण्यास हे मदत करते. याव्यतिरिक्त गुळ आणि दूध एकत्र घेत प्रतिकारशक्तीदेखील चांगली होते.

Advertisement

५.  पीरियड्समध्ये फायदेशीर : अशी पुष्कळ पोषकद्रव्ये गुळामध्ये आढळतात, ज्यामुळे पोटातील वेदना आणि पीरियड्स दरम्यान होणारा त्रास कमी करण्यास मदत होते. गूळ खाण्याने मूडही चांगला राहतो.

Advertisement

संपादन : रुपाली दळवी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply