Take a fresh look at your lifestyle.

राहुल गांधी यांनी जाहीर केला महत्वाचा निर्णय; त्यामुळे बंगालमध्ये कॅन्सल केल्या सर्व सभा..!

दिल्ली :

Advertisement

देशभरात सध्या करोना विषाणूच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. वर्षभरापासून यावर भूमिका घेऊन या विषाणूला रोखण्यासाठी सामुहिक प्रयत्नांची हाक काँग्रेस नेते राहुल गांधी देत आहेत. त्यांच्या मुद्द्यांकडे त्यावेळी केंद्र सरकारनेही गंभीरपणे घेतले नव्हते. मात्र, आता त्यांनी सल्ला न देता निवडणुकीच्या कालावधीतही एका महत्वाच्या निर्णयाची घोषणा केली आहे.

Advertisement

राहुल गांधी यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, वाढत्या करोना रुग्णांची संख्या लक्षात घेऊन निवडणूक प्रचार सभा घेणे योग्य वाटत नाही. त्यामुळे मी सर्व सभा रद्द करीत आहे. इतर नेते आणि सर्वच राजकीय पक्षांनी हा संकटाच्या काळात असाच निर्णय घ्यावा. राहुल गांधी यांनी घेतलेल्या या भूमिकेबद्दल अनेकांनी त्यांना पाठींबा दिला आहे. दरम्यान, भाजपने सभा न घेता प्रचार चालू ठेवण्याचे यापूर्वीच निवडणूक आयोगाकडे पत्राद्वारे म्हटले होते. सर्वांना प्रचाराची समान संधी देण्याच्या मुद्द्यावर प्रचार बंद करण्यास भाजपचा विरोध आहे.

Advertisement

Rahul Gandhi on Twitter: “In view of the Covid situation, I am suspending all my public rallies in West Bengal. I would advise all political leaders to think deeply about the consequences of holding large public rallies under the current circumstances.” / Twitter

Advertisement

मात्र, राहुल गांधी यांनी आवाहन किंवा सल्ला न देता याबाबत थेट निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे आता भाजप आणि तृणमूल काँग्रेस कोणती भूमिका घेतात की आणखी जोरात प्रचार करून गर्दी वाढवतात याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे    

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply