Take a fresh look at your lifestyle.

फोनच्या मुद्द्यावर भाजपने सुनावले मुख्यमंत्र्यांना; ‘रांगेत आहात’ असे सांगतानाच हाणला टोमणा

मुंबई :

Advertisement

राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा असल्याने सध्या अनेक रुग्णांचा जीव संकटात आहे. अशावेळी केंद्र सरकारने राज्याला ऑक्सिजन वायू देण्यासाठी मदत करण्याचे आवाहन करण्याचा प्रयत्न केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन केला होता. त्यावेळी ते प्रचारात व्यस्त असल्याने नंतर यावर बोलतील असे पंतप्रधान कार्यालयाने म्हटल्याचा मुद्दा व्हायरल होत आहे. त्यावर महाराष्ट्र भाजपने सुनावले आहे.

Advertisement

nikhil wagle on Twitter: “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री @OfficeofUT यांनी ॲाक्सिजन आणि रेमडिसिवीरच्या तात्काळ पुरवठ्यासाठी @PMOIndia ला फोन केला. तेव्हा पंतप्रधान प. बंगालच्या दौऱ्यावर आहेत, परत आल्यावर संपर्क साधतील, असं त्यांना सांगण्यात आलं. आता बोला!” / Twitter

Advertisement

ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे यांच्यासह अनेकांनी हा मुद्दा उपस्थित करून पंतप्रधान मोदी यांना जनतेवरील संकटापेक्षा निवडणुका जास्त महत्वाच्या असल्याचे आरोप केले आहेत. वागळे यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री @OfficeofUTयांनी ॲाक्सिजन आणि रेमडिसिवीरच्या तात्काळ पुरवठ्यासाठी @PMOIndia ला फोन केला. तेव्हा पंतप्रधान प. बंगालच्या दौऱ्यावर आहेत, परत आल्यावर संपर्क साधतील, असं त्यांना सांगण्यात आलं. आता बोला!

Advertisement

त्यावर महाराष्ट्र भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी प्रतिक्रिया देताना सानावले आहे. त्यांनी म्हटले आहे की, मोदी साहेब म्हणजे काय शाखाप्रमुख वाटला की काय? आलं मनात, लावला फोन व दिली आॅर्डर. यु आर इन क्यू.. म्हणजे तुम्ही रांगेत आहात..

Advertisement

त्यावर भाऊसाहेब आजबे यांनी वाघ यांना आठवण करून देताना लिहिले आहे की, ज्यांनी फोन केला ते तुमच्यासारखे ट्विटर ट्रोल नाहीत तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ज्या गोष्टीसाठी फोन केला ती जर तुम्हाला ‘आलं मनात’ गोष्ट वाटत असेल तर तुमची कातडी किती जाड आहे आणि वृत्ती किती कलुषित आहे हे एकदा चेक करून घ्या. तर, तुकाराम सराफ यांनी लिहिले आहे की, देशाचा पंतप्रधान हा “लोकसेवक” आहे महामारी मध्ये आरोग्यसेवांमध्ये लक्ष द्यायचे सोडून निवडणुकांमध्ये फुल्ल्टाइम बिझी झाल्यामुळे दाढीमध्ये “उवा” झाल्यात का? हे विचारायला मा.मुख्यमंत्र्यानी फोन केला नव्हता…

Advertisement

Avadhut Wagh अवधूत वाघ on Twitter: “मोदी साहेब म्हणजे काय शाखाप्रमुख वाटला की काय? आलं मनात, लावला फोन व दिली आॅर्डर. #You_are_in_Q” / Twitter

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे    

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply