Take a fresh look at your lifestyle.

बारामतीच्या भामट्यांची क्रूर कमाल; ऐन संकटात सुरू केला रुग्णांच्या जीवाशीच खेळ..!

पुणे :

Advertisement

सध्या जगभरात पैसे कसे कमावले याची किंमत संपली असून किती कमावले यालाच महत्व आलेले आहे. त्यामुळेच व्यक्तिगत नैतिकता नावाची गोष्ट औषधाला सापडत नसल्याचे चित्र आहे. याच जगात आता करोना नावाच्या जागतिक संकटात अनेकांनी आपली हातचलाखी सुरू केली आहे. त्याचाच नमुना बारामती येथे पाहायला मिळाला आहे. भामट्यांनी बनावट रेमडेसिविर विकण्याचा हा ‘प्रताप’ सध्या राज्यभरात चर्चेत आहे.

Advertisement

इंदोरमध्ये एका व्यावसायिकाला बनावट रेमडेसिविर विकण्याच्या प्रयत्नात असताना पकडण्यात आले होते. तसाच प्रकार बारामतीतही उघडकीस आलेला आहे. रेमडेसिविर इंजेक्शनच्या वापरलेल्या बाटल्यांमध्ये पॅरासिटामॉल या औषधाचे पाणी भरून तीच बाटली चक्क ३५ हजारांना विकण्याचा खेळ या टोळीने सुरू केला होता. मात्र, पोलिसांनी ही टोळी जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. त्यांनी यापूर्वी किती जणांना असे औषध देऊन फसवले आणि जीवाशी खेळ केला याचाही तपास घेतला जात आहे.

Advertisement

याप्रकरणी प्रशांत सिद्धेश्वर घरत (२३, रा. इंदापूर, पुणे), शंकर दादा भिसे (२२, रा.काटेवाडी, बारामती), दिलीप ज्ञानदेव गायकवाड (३५, रा. काटेवाडी, बारामती), संदीप गायकवाड (२०, रा.भिगवण, पुणे) यांना पोलिसांनी अटक केली आहे. हे भामटे पकडल्याने या भागात खळबळ उडाली आहे. या टोळीचा म्होरक्या हा आरोग्य विमा एजंट दिलीप गायकवाड आहे. गायकवाड याच्याकडे वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये सफाई कामगार, वॉर्ड बॉय म्हणून कामाचा अनुभव असल्याने त्याने ही नागरिकांच्या जीवाशी खेळण्याची शक्कल लढवली होती. मडेसिविर इंजेक्शनच्या रिकाम्या बाटल्या गोळा करून तो त्यात सिरिंज साह्याने पॅरासिटॅमॉल औषधाचे पाणी भरून फेविक्विकने बाटली पुन्हा सील करून विकण्याचा खेळ त्यांनी सुरू केला होता.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे    

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply