Take a fresh look at your lifestyle.

IPL 2021 : म्हणून संजू म्हणाला, ‘तो सामना १०० वेळा खेळला तरी तेच केले असते..’

मुंबई :

Advertisement

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२१ मध्ये दिल्ली कॅपिटलला राजस्थान रॉयलने तीन गडी राखून पराभूत केले. राजस्थान रॉयल्सकडून ख्रिस मॉरिसने १८  चेंडूत नाबाद ३६ धावा केल्या आणि संघाला विजय मिळवून दिला. ख्रिस मॉरिसने आपल्या खेळीदरम्यान चार षटकार ठोकले आणि दिल्ली कॅपिटलच्या हातातोंडाशी आलेला विजय खेचला. सामन्यानंतर राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनला पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यादरम्यान ख्रिस मॉरिसला शेवटच्या चेंडूवर स्ट्राइक न देण्याच्या निर्णयाबद्दल विचारले असता तो म्हणाले की,  जर तो सामना १०० वेळाही खेळला तरी मी तेच केले असते असे तो म्हणाला.

Advertisement

संजू सॅमसनने पंजाबविरुद्ध ११९ धावांची शानदार खेळी केली होती. शेवटच्या दोन चेंडूंवर विजयासाठी पाच धावांची आवश्यकता होती. पाचव्या चेंडूवर एकच धावा करण्याची संधी होती,  परंतु सॅमसनने तसे केले नाही आणि मॉरिसला स्ट्राइक दिली नाही, त्याने त्याला माघारी धाडले. मॉरिसने ज्या प्रकारे दिल्ली कॅपिटलच्या विरोधात फलंदाजी केली ते पाहता पुन्हा एकदा सॅमसनचा योग्य निर्णय होता की चुकला याची चर्चा रंगली आहे.

Advertisement

सॅमसन म्हणाला,  मी नेहमी माझ्या खेळाचे पुनरावलोकन करतो. मी तो सामना १००  वेळा खेळलो तरी मी ती धाव घेतली नसती.  दिल्लीच्या सामन्याबद्दल सॅमसन म्हणाला,  खरे सांगायचे तर ४२ धावांवर पाच गडी गमावल्यानंतर मला वाटले आता अवघड होईल. आमच्याकडे डेव्हिड मिलर आणि ख्रिस मॉरिस होते पण मला वाटले की त्यांना आता खेळणे अवघड होईल. मी आत बसलो होतो आणि प्रार्थना करीत होतो की मॉरिसने आणखी एक सिक्सर मारावा.

Advertisement

संपादन : अपेक्षा दानी   

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply