Take a fresh look at your lifestyle.

IPL 2021 : कर्णधार पंतच्या ‘त्या’ निर्णयावर पॉन्टिंग खूष नाही; कारण..

मुंबई :

Advertisement

राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान कर्णधार ऋषभ पंतने घेतलेल्या एका निर्णयामुळे दिल्ली कॅपिटलचा मुख्य प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग खूष नाही. रिकी पॉन्टिंग म्हणाले की,  आर अश्विनकडून आम्ही संपूर्ण चार षटके केली नाहीत, ही आमच्या बाजूने केलेली चूक होती. कारण अश्विनने आपल्या तीन षटकांत केवळ १४  धावा दिल्या.

Advertisement

अश्विनने संपूर्ण चार षटके का टाकली नाही यावर चर्चा करण्यासाठी कर्णधार पंतसमवेत बसणार असल्याचे पॉन्टिंग म्हणाला. अश्विनची त्या सामन्यात एक ओवर बाकी होती,  पण असे असूनही पंतने बॉल मार्कस स्टोइनिसकडे सोपविला.  सामन्यानंतर पॉन्टिंग म्हणाला,  मला वाटते की अश्विनने  शानदार गोलंदाजी केली, पण आम्ही त्याला पूर्ण षटके टाकू न दिल्याची चूक केली.

Advertisement

अश्विनच्या जागी पंतने चेंडू स्टोइनिसकडे चेंडू दिला आणि राजस्थान रॉयल्सने त्या ओवरमध्ये १५  धावा चोपल्या,  त्यामध्ये डेव्हिड मिलरच्या तीन चौकारांचा समावेश आहे. याबद्दल कॅप्टन पंतशी बोलणार असल्याचे पॉन्टिंग यांनी सांगितले.  तो म्हणाला,  अश्विनने तीन षटकांत केवळ १४  धावा दिल्या,  एकही चौकार दिला नाही. मागील सामना त्याच्यासाठी खराब होता,  त्यानंतर त्याने आपल्या गोलंदाजीवर खूप परिश्रम घेतले आणि या सामन्यात त्याने चूक केली नाही. प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटलने २० षटकांत आठ गड्यांच्या मोबदल्यात १४७  धावा केल्या,  प्रत्युत्तरात राजस्थान रॉयल्सने १९.४ ओवरमध्ये सात गडी गमावून १५० धावा केल्या.

Advertisement

संपादन : अपेक्षा दानी   

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply