Take a fresh look at your lifestyle.

सावधान.. बँकांची ‘ही’ महत्वाची सेवा १४ तासांसाठी होणार बंद..!

मुंबई :

Advertisement

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने भारतीयांना चांगलाच तडाखा बसला आहे. बहुतेक ठिकाणी कडक लॉकडाऊन करण्यात आले आहे. कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी सुरु आहे. उद्योग-व्यवसाय ठप्प झाले आहेत. अनेक जण ‘वर्क फ्रॉम होम’ (work from home)  करीत आहेत. नेट बँकिंग (Net Bankig), मोबाईल अ‍ॅप्सद्वारे (Mobile Application) पैशांची 17देवाणघेवाण करीत आहेत. अशातच आज (ता. १७ एप्रिल) रात्री १२ वाजेपासून पुढील १४ तासांसाठी बँकेची महत्वाची रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट (Real Time Gross Settlement) अर्थात ‘आरटीजीएस’ (TRGS) सेवा बंद होत आहे. त्यामुळे बँकेच्या खातेदारांची अडचण होणार आहे.

Advertisement

‘आरटीजीएस’ म्हणजे काय?
एकमेकाना पैसे पाठवण्यासाठी ‘आरटीजीएस’ या सेवेचा वापर केला जातो. यात व्यवहार वेगाने होतात. या प्रणालीद्वारे आपण एका बँक खात्यातून दुसर्‍या बँक खात्यात सहजपणे व त्वरित पैसे हस्तांतरित करू शकतो. आरटीजीएस सेवा 26 मार्च 2004 पासून सुरू करण्यात आली. त्यावेळी फक्त चार बँका ही सुविधा देत होत्या. सामान्य ग्राहकही ही सेवा क्वचितच वापरत. या सेवेचा अधिक वापर व्यावसायिक करतात. ‘आरटीजीएस’मध्ये निधी हस्तांतरणासाठी किमान मर्यादा दोन लाख रुपये आहे. मोठ्या निधी हस्तांतरणासाठी ‘आरटीजीएस’चा वापर केला जातो. आपण दररोज आरटीजीएस (RTGS)च्या माध्यमातून व्यवहार करत असाल, तर आपल्यासाठी ही खूप महत्त्वाची बातमी आहे. शनिवारी (ता. १७ एप्रिल) मध्यरात्रीपासून ‘आरटीजीएस’ सेवा 14 तासांसाठी बंद असणार आहे, असे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI / Reserve Bank if India) सांगितले.

Advertisement

का बंद होतेय सेवा?
तांत्रिक सुधारणांसाठी ही सेवा काही तासांसाठी बंद केली जात आहे, असे ‘आरबीआय’चे म्हणणे आहे. 17 एप्रिल 2021 रोजी ‘आरटीजीएस’ प्रणालीची कार्यक्षमता सुधारण्यासाठी आणि ‘डिजास्टर रिकवरी’ची वेळ सुधारण्यासाठी हे काम पूर्ण झाल्यानंतर ‘आरटीजीएस’ तांत्रिकदृष्ट्या सुधारित असेल. त्यामुळे काही तास या सेवेवर परिणाम होईल, असे सांगण्यात आले आहे. दरम्यान, आरटीजीएसचा वापर पूर्वी बँकेच्या वेळेशी जोडला गेला होता. बँक उघडी असेपर्यंतच ही सेवा मिळत होती. मात्र, आता ही सेवा 24 तास उपलब्ध झाली आहे.

संपादन : सोनाली पवार   

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply