Take a fresh look at your lifestyle.

कृषी प्रश्नोत्तरे | भूजल पुर्नभरण : वाचा शेती आणि जलसंधारणाची महत्वाची माहिती

प्रश्न : भूजल म्हणजे काय ?
उत्तर : पावसाचे पाणी भूपृष्ठभागावर पडुन जमीनीत मुरते. मुरणारे पाणी पृष्ठभागाखाली खोलवर जमिनीच्या काही थरामध्ये साठते अशा पाण्याच्या साठयाला आपण भूजल असे म्हणतो.
प्रश्न : विहीर पुनर्भरण म्हणजे काय?
उत्तर : पावसाचे पाणी शुध्द करुन विहीरीत सोडणे म्हणजेच विहीर पुनर्भरण होय.
प्रश्न : कुपनलिका पूनर्भरण म्हणजे काय?
उत्तरः पावसाचे पाणी शुध्द करुन कुपनलिकेत सोडणे म्हणजेच कुपनलिका पुर्नभरण होय.
प्रश्न : भुजलपातळी कायम ठेवण्याकरीता काय करणे उचित ठरेल ?
उत्तर : भुजलपातळी कायम ठेवण्याकरीता मुख्यत: भूजल पुनर्भरणाच्या उपाय योजना राबविणे व शेतावरील विहीर अथवा कूपनलिकेचे पुनर्भरण करणे उचित ठरेल.
प्रश्न : भुजल पूनर्भरणाच्या प्रमुख तीन पध्दती कोणत्या ?
उत्तर : भुजलपूनर्भरणाच्या प्रमुख तीन पध्दती १. प्रत्यक्ष पध्दत, २. अप्रत्यक्ष पध्दत व ३. संयुक्त पध्दत
प्रश्न : भुजल पुनर्भरणाची भूपृष्ठसाठा पध्दत म्हणजे नेमके काय?
उत्तर : भुजल पूनर्भरणासाठी वापरण्यात येणारी भूप्रष्ठसाठा पध्दत पाणीसाठा करुन भूजल पुर्नभरण केले जाते. जमिनीवर साचलेले पाणी हळूहळू जमीनीत म्हणजे भुपृष्ठावर प्रत्यक्ष मुरुन खोलवर पोहचते व भूजल साठ्यात भर पडते.
प्रश्न : शेतचाऱ्या, नांगरट इत्यादीव्दारे भुजल पुनर्भरण कसे करतात ?
उत्तर : शेतात पाणी अडविण्यासाठी मोठमोठया चा-या काढाव्यात. खोलवर नांगरट केलेल्या शेतात पावसाचे पाणी आडविले जातेच पण पाणी मुरण्याचा वेगही वाढतो. सरी व वसंबा पध्दतीची रान बांधणी जास्त फलदायक ठरते. अनियमीत चढ़ उताराच्या शेतात ही पध्दत उपयुक्त आहे. सरी वरंबा उताराला आडवे केल्यास जादा पाणी साचते व जमिनीचा अपधाव कमी होऊन भूजल पुनर्भरण होते.
प्रश्न : भुजल पुनर्भरणाची खोरे पूनर्भरण (रिचार्ज बेसीन) पध्दत म्हणजे काय?
उत्तर : नदीच्या प्रवाहाला समांतर किंवा धरणाच्या पाटाला समांतर भागात नदीचा / कालव्याचा थोडासा प्रवाह वळवुन क्षेत्रावर पाणीसाठा करतात. नदीच्या / कालव्याच्या बळविलेल्या प्रवाहात गाळ नसल्याची खात्री करुन किंवा गाळ गाळून पाणी वळवितात यालाच नदीखोरे पूनर्भरण असे म्हणतात.

Krushirang on Twitter: “#मराठी #बातम्या #महाराष्ट्र #भारत #LatestNews #Maharashtra #MarathiNews #News #India #trending #आंबा #mango #pune #startup #business #agri_business #agriwala #agriculture https://t.co/qWIHPNp51O” / Twitter

Advertisement
प्रश्न : भूजलपूनर्भरणासाठी जल व मृद संधारण तंत्राचा कसा वापर करावा ?
उत्तर : मृद संधारणाची खुप कामे राज्यात झाली आहेत व अजुन सुरु आहेत. प्रचलित पध्दतीमध्ये बांध बंदिस्ती, समपातळीतील बांध, ढाळीचे बांध व चा-या इत्यादीचा समावेश होतो. सोलापूर व राहुरी येथील प्रयोगावरुन सिध्द झाले आहे की, जल व मृद संधारणाच्या पध्दतीमुळे त्याभागातील भूजलसाठा ब-याच प्रमाणात वाढला आहे. अशा प्रकारचे अनेक शास्त्रीय दाखले उपलब्ध आहेत. महाबळेश्वर सारख्या अतिपावसाच्या प्रदेशात ढाळाच्या बांधामुळे ६५.६४ टक्के अपधाव कमी झाल्याचा निष्कर्ष आहे. म्हणजेच पावसाचे ६५.६४ टक्के पाणी जमीनीत मुरल्याने भुजलसाठा वाढला आहे.

Krushirang on Twitter: “#मराठी #बातम्या #महाराष्ट्र #भारत #LatestNews #Maharashtra #MarathiNews #News #India #trending https://t.co/zgnTHuCeMO” / Twitter

Advertisement
स्त्रोत :
पुस्तकाचे नाव : प्रश्न शेतकऱ्यांचे उत्तरे कृषी तज्ञांची (वर्ष २०१७)
संकलक : डॉ. आनंद सोळंके, डॉ. कल्याण देवळाणकर, प्रा. मंजाबापू घोरपडे, डॉ. दत्तात्रय पाचारणे, डॉ. योगेश कांदळकर, डॉ. संदीप पाटील
कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, विस्तार शिक्षण संचालनालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. अहमदनगर
वेबसाईट : www.mpkv.ac.in ; फोन : ०२४२६ २४३८६१ ; ईमेल : aticmpkv@rediffmail.com
पुस्तक आर्थिक सहाय्य : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), अहमदनगर (कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य)

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply