Take a fresh look at your lifestyle.

भातखळकरांनी दिले नवाब मालिकांना प्रत्युत्तर; पहा काय म्हटलेय त्यांनी

मुंबई :

Advertisement

ऐन करोना कालावधीत दररोज हजारो नागरिक करोनाचे बळी जात असतानाही केंद्र-राज्य सरकार वाद मिटलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने आणखी एक नवा आरोप करून खळबळ उडवून दिली आहे. त्यावर भाजपने प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे पुढील 4-5 दिवस हा वाद ब्रेकिंग न्यूज म्हणून पुरणार असेच चित्र आहे.

Advertisement

News24 on Twitter: “केंद्र सरकार ने महाराष्ट्र में रेमडेसिविर इंजेक्शन की सप्लाई पर लगाई रोक : @nawabmalikncp #Remedisivir @vinodjagdale80 #MaharashtraFightsCorona https://t.co/VNV3U6w4Cx” / Twitter

Advertisement

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर गंभीर आरोप केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, ‘महाराष्ट्राला रेमडेसिविर विकू नका अन्यथा तुमच्यावर कारवाई करु’ अशी धमकी केंद्राने औषध कंपन्यांना दिली’ आहे. 16 निर्यात कंपन्यांकडे महाराष्ट्र सरकारने रेमडेसिविरसाठी पाठपुरावा केला तेव्हा त्यांच्या प्रतिनिधींनी याबाबत असमर्थता दर्शवली आहे. महाराष्ट्रात औषध पुरवू नये अशीच धमकी त्या कंपन्यांना केंद्राने दिली आहे. कंपन्यांनी असे केले केले तर त्यांचा परवाना रद्द करण्याची कार्यवाही करण्याची धमकी केंद्राने दिली असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे. 

Advertisement

त्यावर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात कोरोनाच्या संकटात राजकारण करू नका. परंतु नवाब मलिक सारखे त्यांचे मंत्री ??? मारून वाट्टेल ती विधाने करत असतात. केवळ केंद्र सरकारवर दुगण्या झाडणे एवढाच एक धंदा (वसूलीशिवाय) यांच्याकडे उरलेला असल्यामुळे कोरोनाच्या संकटात राज्याला स्मशानकळा आली आहे.

Advertisement

Atul Bhatkhalkar on Twitter: “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात कोरोनाच्या संकटात राजकारण करू नका,परंतु नवाब मलिक सारखे त्यांचे मंत्री गांजा मारून वाट्टेल ती विधाने करत असतात.केवळ केंद्र सरकार वर दुगण्या झाडणे एवढाच एक धंदा (वसूलीशिवाय) यांच्याकडे उरलेला असल्यामुळे कोरोनाच्या संकटात राज्याला स्मशानकळा आली आहे.” / Twitter

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे  

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply