Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. राष्ट्रवादीने केला मोदी सरकारवर गंभीर आरोप; पहा काय म्हटलेय रेमडेसिविर खरेदीबाबत..!

मुंबई :

Advertisement

ऐन करोना कालावधीतही राजकारण आणि केंद्र-राज्य सरकार वाद मिटलेला नाही. दररोज हजारो नागरिक करोनाचे बळी जात असतानाही त्यावरील राजकाराला उत आलेला आहे. त्याचाच मोठा फटका महाराष्ट्र राज्याला बसला आहे. आता या वादात राष्ट्रवादी काँग्रेसने आणखी एक नवा आरोप करून खळबळ उडवून दिली आहे.

Advertisement

News24 on Twitter: “केंद्र सरकार ने महाराष्ट्र में रेमडेसिविर इंजेक्शन की सप्लाई पर लगाई रोक : @nawabmalikncp #Remedisivir @vinodjagdale80 #MaharashtraFightsCorona https://t.co/VNV3U6w4Cx” / Twitter

Advertisement

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर गंभीर आरोप केला आहे. ‘महाराष्ट्राला रेमडेसिविर विकू नका अन्यथा तुमच्यावर कारवाई करु अशी धमकी केंद्राने औषध कंपन्यांना दिली’ असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे. सध्या राज्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा भासत असल्याने काळाबाजार तेजीत आहे. त्याला ब्रेक लावण्यात महाविकास आघाडीचे सरकार यशस्वी झालेले नाही. उलट खासगी रुग्णालयांनी या औषधाचा बेसुमार वापर केल्याने या औषधाचे दर पाच-सहा पटीने वाढलेले आहेत. त्यातच मलिक यांनी गंभीर आरोप करून खळबळ उडवली आहे.

Advertisement

16 निर्यात कंपन्यांकडे महाराष्ट्र सरकारने रेमडेसिविरसाठी पाठपुरावा केला तेव्हा त्यांच्या प्रतिनिधींनी याबाबत असमर्थता दर्शवली आहे. महाराष्ट्रात औषध पुरवू नये अशीच धमकी त्या कंपन्यांना केंद्राने दिली आहे. कंपन्यांनी असे केले केले तर त्यांचा परवाना रद्द करण्याची कार्यवाही करण्याची धमकी केंद्राने दिली असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे. 

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे  

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply