Take a fresh look at your lifestyle.

‘ऍग्रीवाला’ घरपोहोच देतोय हापूस आंबा; तरुण शेतकरी मित्रांचा मार्केटिंग फंडा

पुणे :

Advertisement

कोरोना आणि पाठोपाठ आलेल्या लॉकडाऊनने लोकांचे धंदे बंद केले.  पुरवठासाखळी  विस्कळीत झाल्याने शेतमालाचे दरही कोसळले. त्याचा मोठा फटका मागील वर्षी कोकणातील हापूस उत्पादकांना बसला. नेमकी हीच संधी हेरून पुण्यातील ऍग्रीवाला या स्टार्टअप ग्रुपने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. मागील वर्षी कोकणातील शेकडो शेतकऱ्यांचा हापूस आंबा पुण्यातील ग्राहकांना या ग्रुपने विकला. यावर्षीही पुन्हा लॉकडाऊनची परिस्थिती असताना मार्चपासूनच ‘ऍग्रीवाला’ने पुणे शहर व परिसरात देवगड हापूसची पेटी  पाठविण्यास सुरवात केली आहे. या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

Advertisement

‘टॉक्सिकोलॉजिस्ट’ विषयाचे पदवीधर असलेले डॉ. नरेश शेजवळ हे ऍग्रीवालाचे संस्थापक आहेत. त्यांनी म्हटले आहे की, मार्केटमध्ये होणारी मालाची असुरक्षित हाताळणी आणि आंबा पिकविण्यासाठी कार्बाइडचा अनियंत्रित वापर हे आरोग्यासाठी घातक आहे. आताच्या कोरोना काळात तर हे आणखी काळजी वाढवणारे आहे. नफा कमाविण्याच्या दृष्टीने दक्षिणेकडील आंबा आणून काहीजण ग्राहकांना देवगड किंवा रत्नागिरी हापूस म्हणून विकतात. हा दुय्यम प्रतीचा हापूस देवगड किंवा रत्नागिरीच्या नावाने विक्री करून ग्राहकांची फसवणूक चालू आहे. तसेच त्याचाच फटका आपल्या कोकणातील अस्सल हापूस उत्पादकांना बसतो आहे. कारण आपल्या देवगड आणि रत्नागिरी हापूसला ‘जीआय’ मानांकन आहे. म्हणजेच एकप्रकारचे पेटन्टच म्हणा. या नावाने तुम्ही दुसरा हापूस विकल्याने ‘जीआय’ मानांकनाचा लाभ आपल्या शेतकऱ्यांना मिळत नाही.

Advertisement

असे उभारले होम डिलिव्हरी मॉडेल :

Advertisement

डॉ. शेजवळ म्हणाले की, तयारी करून नियोजनबद्धरित्या आम्ही सुरुवात केली. सुमारे ८५०० अल्पभूधारक शेतकर्‍यांचे नेटवर्क आमच्याकडे आहे. ऍग्रीवाला फार्मर्स क्लबच्या माध्यमातून देवगड तालुक्यातील शेतकऱ्यांना मालाच्या गुणवत्तेबाबत प्रशिक्षण दिले. तसेच पुण्यामध्ये डिलिव्हरी चॅनेल उभे केले. मार्चमध्ये होम डिलिव्हरीचे काम सुरु झाले. कारण, मार्चमध्ये ज्यावेळी हापूस कुठेही नजरेस पडत नव्हता त्यावेळी ऍग्रीवालाच्या रसदार देवगड हापूसच्या पेट्या लोकांना घरपोच मिळत होत्या. त्याचा आमच्या ग्रुपला फायदा झाला. काही ग्राहकांनी अस्सल देवगड हापूस आंब्याची चव प्रथमच चाखतो आहोत अशाही प्रतिक्रिया दिल्या. मार्चमध्ये सुरवातीला मगरपट्टा भागात सुरु झालेले होम डिलिव्हरीचे जाळे आता प्रचंड मागणीमुळे संपूर्ण पुण्यात पसरले आहे. थेट ग्राहकविक्रीच्या या उपक्रमामुळे प्रीमियम गुणवत्तेचा आंबा पुणेकरांना वाजवी दरात मिळतो आहे. 

Advertisement

मूळचे दादरचेचे आणि आता स्वित्झर्लंड देशात आयटी इंजिनियर असणारे गणेश काळे या वर्षभरात पुण्यात येऊ शकले नव्हते. त्यांनी ऍग्रीवालाच्या या उपक्रमाची फेसबुकवर माहिती पाहिली आणि ऑनलाईन बुकिंग करून हापूसची पेटी त्यांच्या कुटुंबियांना भेट म्हणून पाठवली. काही व्यावसायिक गिफ्ट देण्यासाठी तर व्यावसायिक संकुले, कार्यालये एकाच वेळी मागणी करून ठोक भावाने आंबा ऑर्डर करत आहेत. मार्केटिंगमध्ये लोकांचा अधिकचा सहभाग होण्यासाठी पार्टटाइम ‘ऍग्रीवाला पार्टनर’ म्हणून संकल्पना राबवली आहे. यात गृहिणी, विद्यार्थी, ‘वर्क फ्रॉम होम’ करणारे कर्मचारीदेखील आंबा विक्रीस मदत करत आहेत. ऑनलाईन प्रतिसाद पाहून बेल्जीयम, न्यूझीलंड येथून काही भारतीय नागरिकांनी हापूस  मागविला आहे. येत्या काळात निर्यात सुरु करण्याचेही नियोजन केले असल्याबाबतची माहिती ऍग्रीवालाने दिली आहे.

Advertisement

व्हाट्सअप वर थेट बुकिंगसाठी लिंक : https://wa.me/message/S3HDYE2FDWNTF1 ; किंवा ७०३०७९३९७० या क्रमांकावर आपण घरपोच पेटी मागवू शकता. 

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply