Take a fresh look at your lifestyle.

चित्रपट कलावंत व कामगार यांना मदतीसाठी मुख्यमंत्र्यांना साकडे; चित्रपट महामंडळाने दिले मागणीपत्र

मुंबई / अहमदनगर :

Advertisement

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांची भेट घेतली आहे. चित्रपट कलावंत, तंत्रज्ञ व कामगार वर्गासाठी लॉकडाउनमध्ये विशेष आर्थिक मदत देण्याची मागणी त्यांनी विनंतीपत्राद्वारे केली असल्याची माहिती जिल्हा मुख्य समन्वयक शशिकांत नजान यांनी दिली आहे.

Advertisement

मागणी पत्रामधील महत्वाचे मुद्दे असे :

Advertisement
  1. संचारबंदी व लॉकडाउन लागू झाल्यावर सर्वप्रकारच्या चित्रिकारणावरही बंदी आहे. त्याला संघटनेचा पूर्ण पणे पाठिंबा आहे.
  2. आपण विविध कर्मचारी वर्गाला या कालावधीत आर्थिक सहाय्य घोषित केले आहे. त्यच पद्धतीने चित्रीकरण व्यवसायावर अवलंबून असणारे रोजंदारीवरील कलावंत, तंत्रज्ञ व कामगार यांची व परिवाराची उपासमार होणार असल्ये त्यांना विशेष आर्थिक मदत द्यावी.
  3. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ व इतर संस्था (शासनाकडे रजिस्टर असलेल्या) त्यांच्या सभासदांना ही मदत देण्यात यावी.

संपादन : विनोद सूर्यवंशी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply