Take a fresh look at your lifestyle.

शेतकऱ्यांनो, काळजी नको..; कोरोनामुळे दुकाने बंद असतानाही असे घ्या खते, बियाणे नि औषधे..!

पुणे :

Advertisement

दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने सरकारने राज्यात संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे व्यापारी, कामगार, मजुरांना मोठा फटका बसत आहे. शेतकऱ्यांनाही शेतीविषयक साहित्य खरेदीत अडचणी येत आहेत. कोरोनामुळे निर्माण झालेल्या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी राज्याच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एक नियंत्रण कक्ष कार्यान्वित केला आहे.

Advertisement

आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर सध्या शेतीच्या मशागतीची कामे सुरु आहेत. मात्र, कोरोनाचा प्रकोप लवकर निवळेल, असे दिसत नाही. त्यामुळे आगामी काळात राज्य सरकारने आणखी कडक निर्बंध सुरु केल्यास यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना खते, बियाणे, तसेच शेतीचे इतर साहित्य मिळविण्यात अडचणी येऊ शकतात. या सर्व गोष्टींचा पुरवठा सुरळीत व्हावा, शेतकऱ्यांना काही अडचण आल्यास त्याचे तातडीने निवारण व्हावे, यासाठी कृषी आयुक्तालय स्तरावर नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. तसे निर्देश कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिले होते.

Advertisement

खते, बियाणे, तसेच इतर काहीही अडचणी आल्यास, राज्य सरकारने शेतकऱ्यांना थेट टोल-फ्री क्रमांकावर कॉल करण्यास सांगितले आहे. त्यासाठी 8446117500 हा भ्रमणध्वनी, तर 18002334000 हा टोल-फ्री क्रमांक आहे. शेतकऱ्यांना काहीही अडचण असेल, तर त्यांनी थेट नियंत्रण कक्षाशी वरील नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन राज्य सरकारतर्फे करण्यात आले आहे. हे नंबर सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत सुरु राहतील. सोबतच अडचण किंवा तक्रार असेल, तर शेतकऱ्यांना controlroom.qc.maharashtra@gmail.com यावर इ-मेलवर ती नोंदवता येईल.

Advertisement

राज्य सरकारने शेतीविषयक मालाची किंमत किंवा साठेबाजीबाबत काही तक्रारी असतील, तर शक्यतो नाव, पत्ता, संपर्क क्रमांक आणि अडचणी किंवा तक्रारींचा संक्षिप्त तपशील द्यावा, असे आवाहन राज्य सरकारने केले आहे. सर्व तक्रारी कागदावर लिहून त्याचे छायाचित्र शक्य असेल, तर व्हॉट्स अ‌ॅप किंवा ई-मेलवर पाठवावी. त्यामुळे तक्रारींचे निराकरण करणे सोयीस्कर होईल, असे राज्य सरकारने म्हटले आहे. ज्या शेतकऱ्यांना हे शक्य नसेल, त्यांनी दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधला, तरीसुद्धा त्याची सोडवणूक केली जाईल, असे कृषी विभागाने सांगितले आहे.

Advertisement

मागील वर्षी केलेल्या लॉकडाऊनमध्ये शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते. शेतकऱ्यांना औषधी, खते, बियाणे, तसेच इतर शेतीविषयक उपकरणे वेळेवर मिळाली नव्हती. या गोष्टीचा विचार करुन, कृषी विभागाने वरील संपर्क क्रमांक जारी केले आहेत. त्याचा शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
संपादन : सोनाली पवार

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply