Take a fresh look at your lifestyle.

अहमदनगर सर्वेक्षण : आमदार-खासदारांच्या कामावर आहे ‘इतकी’ नाराजी; पहा कशाला दिलाय नगरकरांनी कौल

अहमदनगर :

Advertisement

‘अहमदनगर जिल्हा राजकीय – सामाजिक सर्वेक्षण 2021’चा जिल्हानिहाय माहितीचा अहवाल प्रसिद्ध करताना कालच्या दुसऱ्या भागात आपण पाहिले की, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत यांच्या कामाबाबत जिल्ह्यातील जनतेमध्ये बऱ्यापैकी नाराजीची भावना आहे. विकासाच्या मुद्द्यांकडे हे पंचायत राज संस्थेचे हे लोकप्रतिनिधी लक्ष देत नसल्याची भावना आहे. जिल्ह्यातील आमदार आणि खासदार यांच्याबाबतही अशीच भावना आहे.

Advertisement

जिल्ह्यात 12 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्या सर्वांचा जिल्हापातळीवर विचार केल्यास 31.3 टक्के लोकांनी समाधानकारक असे म्हटलेले आहे. तर, आमदारांची कामगिरी बरी असल्याचे मत 40.6 टक्के युझर्सने व्यक्त केले आहे. तसेच 28.1 टक्के लोकांनी आमदारांच्या कामगिरीवर असमाधान व्यक्त केलेले आहे. (विधानसभा मतदारसंघनिहाय परिस्थिती पुढील लेखांमध्ये प्रसिद्ध केली जाणार आहे.) म्हणजे एकूण नाराजीची टक्केवारी चक्क 60 टक्क्यापर्यंत आहे. जिल्ह्यात चमकोगिरी करणारे लोकप्रतिनिधी जास्त असून ठोस आणि भविष्याच्या दृष्टीने स्थानिक विकासाला प्राधान्य देण्याचे काम कोणीही करीत नसल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.

Advertisement

जिल्ह्यातील दोन्ही खासदारांच्या कामाबाबतही सार्वत्रिक नाराजी दिसते. ‘खासदारांचे काम कसे वाटते’ या प्रश्नावर उत्तम काम असल्याचे मत 26.7 टक्के जणांनी व्यक्त केले आहे. तर, काम बरे असून सुधारणेस वाव असल्याचे मत 40 टक्के नागरिकांचे आहे. यासह खासदार म्हणून एकदम वाईट काम केले जात असल्याची भावना 33.3 टक्के जणांनी व्यक्त केली आहे. त्यातही उत्तर नगर जिल्ह्यातील शिवसेना पक्षाचे शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्याबद्दल नाराजी जास्त आहे. ते मतदारसंघातून गायब असल्याने संपर्क न होण्यासह विकासाचे काम करीत नसल्याच्या प्रतिक्रिया सर्वेक्षणात अनेकांनी दिलेल्या आहेत. तर, दक्षिण नगर जिल्ह्यातील भाजप खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्याबद्दल तुलनेने कमी नाराजी आहे. डॉ. विखे यांच्याकडून करोना कालावधीत आरोग्य क्षेत्रात आणखी चांगल्या कामाची अपेक्षा व्यक्त झालेली आहे.

Advertisement

खासदारांनी करावयाच्या कामाबाबतचे महत्वाचे मुद्दे :

Advertisement
  1. शेतकऱ्यांच्या शेतमालास योग्य भाव आणि हमीभाव देण्यासाठी कायमस्वरूपी केंद्र सुरू करावेत.
  2. नगर, पाथर्डी, पारनेर, संगमनेर, शेवगाव व जामखेड भागातील अनेकांनी शेती आणि पिण्यासाठी पाण्याची सोय करण्यासाठी योजना किंवा स्कीम राबवण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.
  3. जिल्ह्यातील सुपा (ता. पारनेर) औद्योगिक वसाहत ज्या पद्धतीने विकसित झाली आहे. त्याच पद्धतीने पांढरीपूल-घोडेगाव (ता. नेवासा) येथील एमआयडीसीसाठी विशेष प्रयत्न व्हावेत.
  4. शिक्षण आणि रोजगाराच्या संधी जिल्ह्यात खूप कमी आहेत. त्यासाठी कोणताही लोकप्रतिनिधी काम करीत नसल्याची नाराजी आहे.
  5. आरोग्य क्षेत्राकडेही सरकारी यंत्रणेचे दुर्लक्ष आहे. करोना कालावधीत हे स्पष्ट अधोरेखित झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात ग्रामीण भागात सरकारी आरोग्य सेवा सक्षम करण्याची मागणी आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे (क्रमशः)

Advertisement

पुढील विश्लेषण प्रसिद्ध होण्याचे वेळापत्रक असे :

Advertisement
सर्वेक्षणाच्या विश्लेषणातील बातमीचा विषयप्रकाशित होण्याचा संभाव्य दिनांक
खासदार व आमदार यांच्या कामाबाबतदि. 17 एप्रिल 2021
जिल्ह्यातील विकास कामाबाबतची भावनादि. 18 एप्रिल 2021
शहरी भाग (महापालिका / नगरपालिका) कामाबाबत मुद्देदि. 19 एप्रिल 2021
विधानसभा मतदारसंघ : अकोलेदि. 20 एप्रिल 2021
विधानसभा मतदारसंघ : कोपरगावदि. 21 एप्रिल 2021
विधानसभा मतदारसंघ : संगमनेरदि. 22 एप्रिल 2021
विधानसभा मतदारसंघ : शिर्डी (राहता)दि. 23 एप्रिल 2021
विधानसभा मतदारसंघ : श्रीरामपूरदि. 24 एप्रिल 2021
विधानसभा मतदारसंघ : नेवासादि. 25 एप्रिल 2021
विधानसभा मतदारसंघ : राहुरीदि. 26 एप्रिल 2021
विधानसभा मतदारसंघ : शेवगाव-पाथर्डीदि. 27 एप्रिल 2021
विधानसभा मतदारसंघ : कर्जत-जामखेडदि. 28 एप्रिल 2021
विधानसभा मतदारसंघ : श्रीगोंदादि. 29 एप्रिल 2021
विधानसभा मतदारसंघ : पारनेरदि. 30 एप्रिल 2021
विधानसभा मतदारसंघ : अहमदनगर शहरदि. 1 मे 2021
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply