Take a fresh look at your lifestyle.

‘त्या’ मुद्द्यावरून शिवसेना-मनसेत जुंपली; सेनेने म्हटले मनसेला चक्क ‘बालिश’..!

मुंबई :

Advertisement

ठाकरे कुटुंबातील दोन्ही ज्येष्ठ बंधूंमध्ये राजकीयदृष्ट्या सख्य नसल्याचे जगजाहीर आहे. वेळोवेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात शाब्दिक वाद होत असतानाच हे दोन्ही पक्ष आणि त्यांचे कार्यकर्तेही एकमेकांशी भिडतात. आताही देशासाठी एका महत्वाच्या आणि राजकीयदृष्ट्या लक्ष नसलेल्या मुद्द्यावर हे दोन्ही पक्ष भिडले आहेत.

Advertisement

केंद्र सरकारने मुंबईतील हाफकिन संस्थेला कोविड 19 ची लस निर्मितीची परवानगी दिली. यासाठी मागणी कोणी केली होती, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणाचे ऐकले आणि त्याचे राजकीयदृष्ट्या श्रेय कोणाचे या मुद्द्यावर हे दोन्ही पक्ष भिडले आहेत. करोनाच्या लस बनवण्याच्या श्रेयामध्ये जसे काहींनी मोदींना व्हॅक्सिन गुरू करून टाकले होते. त्याच पद्धतीने आता हाफकिनमध्ये लस बनवण्यासाठी परवानगी कोणामुळे मिळाली या निरर्थक मुद्द्याला या दोन्ही राजकीय पक्षांनी हात घटला आहे.

Advertisement

Sandeep Deshpande on Twitter: “राज्य सरकारने जानेवारीतच हाफकिंग ला लस बनवण्याची परवानगी देण्याचा प्रस्ताव पाठवला होता.पण त्याची परवानगी राजसाहेबांचं पत्र गेल्यावर आली याला म्हणतात “ठाकरे ब्रँड”.करोना काळात “राजकारण” नको म्हणण्याऱ्यानी आभार मानायला हरकत नव्हती.” / Twitter

Advertisement

राज्यातील कोरोना परिस्थिती गंभीर असतानाच राज्यात लसच्या डोसचा तुटवडा निर्माण झाल्यावर केंद्र सरकार व राज्य सरकारमध्ये वाद झाल्याचे पाहायला मिळाले. आता मनसे व सेनेत दुसरा वाद पेटला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी हाफकिन संस्थेला भेट देत तिथल्या व्यवस्थेची पाहणी करून येथे लस निर्मितीला परवानगी देण्यात यावी अशी मागणी केंद्राकडे केली होती. तर, मनसेप्रमुख राज ठाकरे यांनीही केंद्र सरकारला असेच मागणीपत्र दिले होते. हाफकिनमध्ये आवश्यक ती व्यवस्था आणि साधनसामग्री उभारण्यात आल्यानंतर तिथे लस निर्मिती होण्यापूर्वीच श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे.

Advertisement

मनसेचे संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे की, राज्य सरकारने जानेवारीतच हाफकिंग ला लस बनवण्याची परवानगी देण्याचा प्रस्ताव पाठवला होता. पण त्याची परवानगी राजसाहेबांचं पत्र गेल्यावर आली याला म्हणतात “ठाकरे ब्रँड”.करोना काळात “राजकारण” नको म्हणण्याऱ्यानी आभार मानायला हरकत नव्हती. त्यावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना प्रत्युत्तर दिले आहे. राज ठाकरेंनी पत्रव्यवहार केला आणि हे सर्व महाराष्ट्रासाठी व मुंबईसाठी चांगलेच झाले.  मुख्यमंत्र्यांनी केंद्रासोबत पत्रव्यवहार करत होते. राज ठाकरेंनी पत्रानंतरच हाफकिनला परवानगी मिळाली, असे म्हणणे बालिश होईल.

संपादन : सोनाली पवार

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply