Take a fresh look at your lifestyle.

माहिती पैसे कमावण्याची : म्युच्युअल फंडांत पहिल्यांदाच गुंतवणूक करताय, तर घ्या ‘ही’ काळजी

पुणे :

Advertisement

टीव्हीवर आपण नेहमीच म्युच्युअल फंडांत (mutual fund investment) गुंतवणूक करण्याबाबत जाहिराती पाहत असतो. मात्र, त्यात जास्त काही समजत नसल्याने, या जाहिराती आपल्यासाठी नाहीतच, असे समजून आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. मात्र, तुम्ही म्युच्युअल फंडाबाबत थोडे-फार जरी समजून घेतले, तरी तुम्ही घरबसल्या चांगली कमाई करू शकता. म्युच्युअल फंडांत गुंतवणूक करण्याची इच्छा असल्यास, ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. चला तर मग म्युच्युअल फंडांत पहिल्यांदाच गुंतवणूक करताना काय काळजी घ्यावी, याबाबत समजून घेऊ या..

Advertisement

म्युच्युअल फंडातून पैसे कमविण्यासाठी निश्चित अशी योजना तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. तुम्ही जर पहिल्यांदा गुंतवणूक करणार असाल, तर लार्ज कॅप फंड ही पहिली पसंती असली पाहिजे. त्यानंतर गुंतवणूकदाराने इंडेक्स फंडाला प्राधान्य द्यावं, असे या क्षेत्रातील जाणकार सांगतात. आतापर्यंत म्युच्युअल फंडांत गुंतवणूक करणाऱ्यांना लार्ज कॅप फंड आणि इंडेक्स फंड हा सर्वाधिक पसंतीचा गुंतवणूक पर्याय ठरला आहे. त्यात कमी प्रमाणात जोखीम असल्याने, नफा मिळवता येऊ शकतो. मात्र, हेही लक्षात घ्या, की म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन असते. कोणतीही म्युच्युअल फंड स्कीम ही जोखीममुक्त नाही.

लाईव्ह मिंटच्या वृत्तानुसार, कर व गुंतवणूक तज्ज्ञ जितेंद्र सोलंकी म्हणतात, की आपण पहिल्यांदाच म्युच्युअल फंडांत गुंतवणूक करणार असाल, तर तुमच्यासाठी लार्ज कॅप फंडातील (large cap fund) गुंतवणूक अधिक फायद्याची ठरू शकेल. या फंडांत फंड मॅनेजर्स टॉप-100 सूचिबद्ध कंपन्यांच्या शेअर्समध्ये (big companies share) गुंतवणूक करतात. त्यात स्मॉल आणि मिडीयम शेअर्सच्या तुलनेत बरेच कमी ‘डेव्हिएशन’ पाहायला मिळते. त्यामुळे लार्ज कॅप शेअर्समध्ये गुंतवणुक करणाऱ्या फंडामध्ये कमी प्रमाणात धोका असतो.

Mirae asset large cap direct growth funds, Axis blue chip direct growth fund आणि Canara Rebeco bluechip direct growth fund मध्ये गुंतवणुक केल्यास फायदा होऊ शकतो, असे सोलंकी यांचे म्हणणे आहे. तसेच डायरेक्ट ग्रोथ प्लॅनमध्ये केलेली गुंतवणूकही फायद्याची ठरू शकते. कारण, डायरेक्ट ग्रोथ प्लॅनमध्ये ब्रोकरची भूमिका कमी होते. गुंतवणूकदारांना दीर्घ मुदतीत १ ते १.५ टक्के अधिक म्युच्युअल फंड व्याज मिळते. तुम्हाला एकरकमी गुंतवणूक करता येणार नसेल, तर आपण एसआयपीमार्फतही गुंतवणूक करू शकतो.

goodmoneying.com च्या मनीकिरण सिंघल यांच्या म्हणण्यानुसार, इंडेक्स फंडदेखील गुंतवणूक करणाऱ्यासाठी चांगला पर्याय आहे. यामध्ये जोखीम कमी असते आणि प्रगतीही इंडेक्सच्या प्रगतीसोबत जोडलेली असते. तुम्ही पहिल्यांदाच गुंतवणूक करीत असाल, तर UNI Nifty 50, HDFC Nifty 50 आणि HDFC Sensex मध्ये गुंतवणूक करू शकता, असा सल्ला त्यांनी दिला आहे. याशिवाय विविध म्युच्युअल फंडच्या इंडेक्स फंड्सवर येणाऱ्या एक्स्पेन्सेसवर नजर टाकली तर, फंडावर येणार एक्स्पेन्स जितका अधिक असेल, तितका तुमचा रिटर्न अधिक असेल.

संपादन : सोनाली पवार

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply