Take a fresh look at your lifestyle.

कोरोन अपडेट : कुंभमेळ्यात फुटले वादाला तोंड; बैरागी आखाड्याने केला ‘त्यांच्या’वर आरोप..!

दिल्ली :

Advertisement

करोनाची रुग्णसंख्या वाढत असतानाच देशात सध्या कुंभमेळा आणि निवडणुकांच्या प्रचारसभा जोरात आहेत. नागरिकांच्या आरोग्याची काळजी असलेल्या अनेकांनी या दोन्ही प्रकारांच्या विरोधात मत मांडले आहे. तर, काहींनी कुंभमेळा आणि निवडणुकीचा प्रचार कसा बरोबरच आहे याची मांडणी केली आहे. यावरून वाद असतानाच थेट कुंभमेळ्याच्या आखाड्यांमध्ये वादाला तोंड फुटले आहे. त्याला निमित्त आहे करोना प्रसाराचे.

Advertisement

हरिद्वार येथील कुंभमेळ्यात काेराेना कुणी पसरवला आणि मध्येच कुंभाच्या समाप्तीवरून आखाड्यांत जुंपली असून संन्यासी आखाड्यामुळेच कोरोना पसरल्याचा आरोप बैरागी आखाड्याने केला आहे. दरम्यान, शाही स्नानानंतर तिथे ५० पेक्षा जास्त साधूंना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मागील दोन दिवसात जूना निरंजनी व आव्हान आखाड्याच्या अनेक साधूंना कोरोना आल्याच्या बातम्या आहेत. हरिद्वार जिल्हा प्रशासनाने येथे रँडम सॅम्पलिंग वाढवले आहे. चाचणी केल्य्मुळे आता रुग्णसंख्या वाढत आहे.

Advertisement

त्याचवेळी वादाला तोंड फुटले आहे. आखाडे एकमेकांवर करोना प्रसाराचा आरोप करीत आहेत. निर्वाणी आखाड्याचे महामंडलेश्वर कपिल देव यांचे कोरोनाने निधन झाले असल्याने खळबळ उडाली आहे. कुंभमेळा समाप्त करण्याच्या घोषणा देऊन काहींनी अशी घोषणा केली आहे. तर, काहींनी अजूनही कुंभमेळा चालू असल्याचे म्हटलेले आहे. दुसरीकडे, कुंभमेळा निर्धारित ३० एप्रिलपर्यंत सुरूच राहील, असे स्पष्टीकरण सरकारने दिलेले आहे. 

Advertisement

निर्मोही आखाड्याचे अध्यक्ष महंत राजेंद्र दास यांनी म्हटले आहे की, वाढत्या संसर्गासाठी आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्रगिरी जबाबदार आहेत. तर, निरंजनी आखाड्याचे सचिव महंत रवींद्रपुरी म्हणाले, महत्त्वाचे शाही स्नान पूर्ण झालेले असतानाच अनेक साधूंमध्ये कोरोनाची लक्षणे दिसत आहेत. यामुळे आमच्या आखाड्यासाठी कुंभमेळा संपला आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply