Take a fresh look at your lifestyle.

डॉ. बावस्कर पॅटर्न : ‘रेमडेसिविर’विना वाचवले ६४० जीव; पहा नेमकी काय आहे त्यांची उपचारपद्धती

नाशिक :

Advertisement

सध्या जगभरात करोनाचे थैमान सुरू आहे. अशावेळी रुग्णांना वाचवण्यासाठी रेमडेसिविर नावाच्या औषधाचा सर्रास वापर केला जात आहे. जागतिक आरोग्य संघटना, संशोधन संस्था आणि अनेक तज्ञांनी वेळोवेळी म्हटले आहे की, ‘रेमडेसिविर’ ही काही संजीवनी नाही. मात्र, तरीही खासगी व सरकारी रुग्णालयात सर्रास याचा वापर केला जात असतानाच डॉ. हिंमतराव बावस्कर यांनी १३ महिन्यांपासून रेमडेसिविरचा एकदाही वापर न करता ६४० रुग्णांना जीवनदान दिले आहे.

Advertisement

वाचून अनेकांना आश्चर्य वाटेल, मात्र हे खरे आहे. कारण, दैनिक दिव्य मराठी व लोकमत यासह अनेक वृत्तपत्रांनी याची दखल घेऊन याबाबत सविस्तरपणे बातमी प्रसिद्ध केली आहे. विंचूदंशावरील उपचारांबाबत जागतिक नावलौकिक मिळविलेले डॉ. हिंमतराव बावस्कर यांनीच हे मोठे कार्य केले आहे. ‘ही वेळ पैसे कमवण्याची नाही, तर आपल्या ज्ञानाच्या आधारावर वैद्यकीय क्षेत्रात नवीन संशोधन देण्याची आहे’ असेही त्यांनी म्हटलेले आहे.

Advertisement

Himmatrao Bawaskar – Wikipedia : http://www.en.wikipedia.org/wiki/Himmatrao_Bawaskar

Advertisement

वयाची सत्तरी ओलांडलेल्या डॉ. बावस्कर यांनी म्हटले आहे की, बीसीजी आणि एमएणआर या लसी घेतलेल्या असल्याने लहान मुलांना हा संसर्ग होत नाही. त्यामुळे आम्ही स्वत:च्या प्रतिबंधासाठी या लसी घेतल्या आणि रुग्णसेवा सुरू ठेवली. ना पीपीई कीट वापरले ना रेमडेसिविर दिले. मास्क, शील्ड आणि ग्लोव्हज यांचा उपयोग करूनच रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Advertisement

डॉ. बावस्कर यांचे मुद्दे असे :

Advertisement
  • स्टिरॉईड, ऑक्सिजन, अँटी व्हायरल आणि अँटी कोऑगुलंट याच्या उपचाराने त्याची ऑक्सिजनची पातळी ९५% पर्यंत वाढवली.
  • कोरोना रुग्णांना पालथे झोपवून उपचार केल्यास, त्यांची फुफ्फुसे वर येतात व ऑक्सिजनचे प्रमाण वाढते.
  • गोवर आणि रुबेला या विषाणूंमधील ६०% अमोनो अॅसिड करोना विषाणूसारखेच असल्याने स्वत:च्या बचावासाठी त्यांनी व त्यांच्या पत्नी डॉ. प्रमोदिनी यांनी बीसीजी आणि एमएमआर या लसी घेऊन कोरोना रुग्णांवर त्यांच्या रुग्णालयात उपचार सुरू केले.
  • कुटुंबियांनाही फिजिकल डिस्टन्स, मास्कची सक्ती, सातत्याने स्वच्छता आणि नाकात आयोडीनचे ड्रॉप यासह प्रतिकार शक्ती वाढविण्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपचार व प्रशिक्षण दिले.
  • ६५० रुग्णांवर उपचार केले असून त्यापैकी फक्त ११ रुग्ण दगावले आहेत. ते देखील उशिरा आल्याने उपचारास प्रतिसाद मिळाला नसल्याचा दावा.
  • चार उपचार : १. नेब्युलायझरद्वारे मिथिलन ब्ल्यू, २. रुग्णाचे मनोबल वाढवणे, ३. ऑक्सिजन, ४. स्टिरॉईड्स
  • चार पथ्ये : १. प्रत्येक रुग्णाच्या नाकावर मास्क सक्तीचा, २. एका वेळी एकच रुग्ण तपासण्यासाठी आत घेणे, ३. कमीत कमी वेळात तपासून घरी पाठवणे, ४. खोकत असलेल्या रुग्णांना प्राधान्याने तपासणे

संपादन : विनोद सूर्यवंशी

Advertisement

news : https://www.lokmat.com/editorial/coronavirus-news-doctor-friends-not-time-make-money-a309/

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply