Take a fresh look at your lifestyle.

मॉन्सून अंदाज : पहा हवामान विभागाने ९८ टक्के पाऊस पडण्याबाबत काय म्हटलेय ते

पुणे :

Advertisement

खासगी हवामान संस्था स्कायमेटनंतर आता भारताची सरकारी हवामान संस्था असलेल्या हवामान विभागाने आपलाही अंदाज जाहीर केला आहे. या पहिल्या टप्प्यावरील अंदाजानुसार देशात सरासरीच्या ९८ टक्के पाऊस होईल असे म्हटलेले आहे. यंदा हवामान विभागाने सलग तिसऱ्या वर्षी सरासरीएवढा पाऊस होईल असेही त्यांनी म्हटलेले आहे.

Advertisement

हवामान विभागाने अंदाज व्यक्त करताना सांगितलेले महत्वाचे मुद्दे असे :

Advertisement
  1. सध्या ला-निना व इंडियन डायपोल परिस्थिती न्यूट्रल असल्याने प्रशांत महासागर व हिंद महासागरात समुद्राच्या पृष्ठभागाच्या दोन्ही बाजूंवर तापमानातील फरक भारतीय मान्सूनला प्रभावित करत नाही.
  2. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, गुजरात, दक्षिण छत्तीसगड, कर्नाटक, तेलंगण व केरळमध्ये पावसाळ्यात जोरदार पावसाची शक्यता आहे.
  3. उत्तर प्रदेशचा पूर्व भाग, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, छत्तीसगडचा उत्तर भाग, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, जम्मू-काश्मीर, लडाख आणि ईशान्येकडील राज्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता.
  4. पावसाळ्याच्या चार महिन्यांत सरासरी ८८० मिमी पाऊस होतो आणि त्याच्या ९६ ते १०४ टक्के पाऊस झाल्यास त्याला सरासरीएवढा पाऊस म्हटले जाते.

Hindustan Times on Twitter: “Monsoon in 2021 is likely to be “normal” at around 98% of the long period average (LPA), India Meteorological Department (IMD) said in its long-range forecast (report by @jayashreenandi) https://t.co/o8zyePBgTu” / Twitter

Advertisement

पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डाॅ. एम. राजीवन यांनी म्हटले आहे की, १९६५, १९७२ आणि १९७४ ही तीन वर्षे ला-निना वर्षांनंतरची वर्षे होती, या तिन्ही वर्षांत सरासरीएवढा ते त्यापेक्षा कमी पाऊस झाला होता, पण इतर सर्व वर्षांत सरासरीएवढा किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाला. गेल्या ७० वर्षांत १४ वेळा ला-निना स्थिती राहिली होती, त्यापैकी एक गेल्या वर्षी २०२० मध्ये होती. या १४ वर्षांच्या अगदी पुढील वर्षांत सामान्यपणे मान्सून सरासरीएवढा किंवा थोडासा नकारात्मक राहिला आहे. तर, महासंचालक डाॅ. मृत्युंजय महापात्रा यांनी पहिल्याच पूर्वानुमानात पावसाच्या वितरणाचे चित्रही सादर केले आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Dr Harsh Vardhan on Twitter: “#Monsoon cheer🌧️🌧️ #India to receive normal rainfall in 2021 As per @Indiametdept’s 1st stage long range forecast for 2021 South West Monsoon, seasonal rainfall (Jun-Sep) over the country as a whole is likely to be normal at 96 to 104 % of Long Period Average. @moesgoi” / Twitter

Advertisement

Advertisement

Leave a Reply