Take a fresh look at your lifestyle.

नगरकरांनो, 14 दिवस जनता कर्फ्यू पाळा की..; पालकमंत्री मुश्रीफ यांनी केले आवाहन

अहमदनगर :

Advertisement

जिल्ह्यातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आता कडक निर्बंधांची अंमलबजावणी करतानाच साखळी तोडायची असेल तर पहिल्या लाटेत जसे सहकार्य केले त्यापेक्षाही अधिक कडकपणे नियमांचे पालन करुन कोरोनाची ही लाट थोपविण्याची गरज आहे. त्यासाठी पुढील १४ दिवस जिल्ह्यात जनता कर्फ्यू आवश्यक असून त्यासाठी आता ग्रामपातळीवरील दक्षता समित्या आणि नागरी भागातील प्रभाग समित्यांनी क्रियाशील होण्याची आवश्यकता असल्याचे आवाहन राज्याचे ग्रामविकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे.   

Advertisement

पालकमंत्री यांच्यासह महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि नगरविकास, ऊर्जा, आदिवासी विकास, उच्च  व तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना संदर्भात आढावा बैठक घेतली. यावेळी पालकमंत्री म्हणाले की, सध्या कोरोनाची दुसरी लाट तीव्र आहे. अपेक्षेपेक्षा जास्त प्रमाणात नागरिक बाधित होत आहेत. अशावेळी कोरोना संसर्गाची साखळी तोडणे हे अधिक महत्वाचे आहे. त्यामुळेच जिल्ह्यात जनता कर्फ्यूचा विचार पुढे आला आहे. जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णाला होम आयसोलेशन केले जात होते. मात्र, आता कडकपणे संस्थात्मक विलगीकरणच केले जाणार आहे. बाहेरुन येणाऱ्या व्यक्तीची चाचणी केली गेली पाहिजे. तरच संसर्गाला आळा बसू शकेल.

Advertisement

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले, खासदार सदाशिव लोखंडे, आमदार डॉ. सुधीर तांबे, बबनराव पाचपुते, संग्राम जगताप, नीलेश लंके, रोहित पवार, लहू कानडे,  जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, महानगरपालिका आयुक्त शंकर गोरे, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा शल्य चिृकित्सक डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, जिल्हा साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. दादासाहेब भोसले, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वीरेंद्र बडदे आदी उपस्थिती होते.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply