Take a fresh look at your lifestyle.

IPL 2021 : बेंगलोर आणि हैद्राबादच्या सामन्यात नोंदला गेला ‘हा’ विक्रम..!

मुंबई :
इंडियन प्रीमियर लिग सुरु झाली की नवे नवे विक्रम प्रस्थापित केले जातात आणि ते तोडलेही जातात. यामध्ये फलंदाजांच्या चौकार आणि षटकारांची आतिषबाजी आणि गोलंदाजांच्या विकेटसची मोठी यादीच तयार होते. मात्र नुकत्याच खेळल्या गेलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामन्यात कॅचचे नवे रेकॉर्ड नोंदले गेले.

Advertisement

या सामन्यात एकूण १६ कॅच घेण्यात आले होते, जे आयपीएल सामन्यात आतापर्यंतचे सर्वाधिक कॅच आहेत. यापुर्वी आयपीएलमधील सामन्यात इतके कॅच कधीच घेतले गेले नाहीत. प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूने २० षटकांत ८ गडी गमावून १४९ धावा केल्या. त्याचे सर्व फलंदाज झेलबाद झाले. आणि तेवढेच हैद्राबादचे फलंदाज झेलबाद झाले.

Advertisement

यापूर्वी असे तीन वेळा घडले आहे जेव्हा आयपीएलमधील सामन्यात १५ कॅच घेतले गेले. २०१० मध्ये डेक्कन चार्जर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात झालेल्या सामन्यात १५ झेल घेण्यात आले. सात वर्षांनंतर २०१७ मध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात झालेल्या सामन्यातही १५ झेल घेण्यात आले. मागील हंगामात कोलकाता आणि राजस्थान यांच्यात झालेल्या सामन्यातही १५ कॅच घेण्यात आले होते. यंदा १६ झेल घेण्याचा विक्रम आरसीबी आणि एसआरएचच्या सामन्यात नोंदला गेला.
संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply