Take a fresh look at your lifestyle.

एलआयसी कर्मचाऱ्यांची चांदी; घसघशीत पगारवाढ, सोबत ‘इतका’ ‘स्पेशल अलाउन्स’..!

मुंबई :

Advertisement

भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसी (LIC / Life Insurance Corporation Of India). भारतीय नागरिकांचे भविष्य सुखकर, आरामदायी करणारी कंपनी. नागरिकांना विमा पॉलिसीच्या माध्यमातून सुरक्षा देणारा आधार. सर्वसामान्य नागरिकांसह आता एलआयसीच्या कर्मचाऱ्यांचेही भवितव्य सुखमय होणार आहे.. एलआयसी कर्मचाऱ्यांसाठी हे वर्ष आनंददायी बातमी घेऊन आले आहे. चला तर मग एलआयसी कर्मचाऱ्यांना दिलासा देणारी बातमी काय आहे, त्यातून या कर्मचाऱ्यांचा काय फायदा होणार आहे..?

Advertisement

एलआयसीमध्ये सुमारे १ लाख 14 हजार कर्मचारी काम करतात. या सार्‍या कर्मचाऱ्यांसाठी 2020-21 हे आर्थिक नवं वर्ष फलदायी ठरणार आहे. त्याला कारणही तसेच आहे, एलआयसी कर्मचार्‍यांना तब्बल १६ % पगारवाढ जाहीर झाली असल्याची माहिती युनियन लीडरने दिली आहे. बिजनेस स्टॅंडर्डच्या (Business Standard) बातमीनुसार, सरकारने एलआयसी कर्मचार्‍यांच्या पगारात वाढ केल्याचं सांगण्यात येतंय. ही पगारवाढ 1 ऑगस्ट 2017 पासून लागू असेल.

Advertisement

ऑल इंडिया इन्शुरन्स एम्प्लॉईज असोसिएशन (All India Insurance Employees Association) चे जनरल सेक्रेटरी श्रीकांत मिश्रा यांच्या माहितीनुसार, ‘सध्याच्या कोरोनाच्या संकटात अनेक आस्थापना अडचणीत असतानाही एलआयसी कर्मचाऱ्यांना पगारवाढीची बातमी मिळणं दिलासादायक बाब आहे. कर्मचार्‍याना प्रति महिना २५ % पगारवाढ अपेक्षित होती.’

Advertisement

दरम्यान, सार्‍या कॅडरमधील कर्मचार्‍यांना पगारवाढीसोबतच १५०० ते १३,५०० रुपये ‘स्पेशल अलाऊंस’ जाहीर करण्यात आला आहे. तो “डीए’मध्ये (महागाई भत्ता) मोजला जाणार आहे. हाऊस रेंट अलाऊंस, सिटी कॉम्पेन्सेंटरी अलाऊंस, प्रिव्हिलेज लिव्ह एन्कॅशमेंट, ग्रॅज्युटी, सुपर अ‍ॅन्युएशन इन्कम यात मोजले जाणार नाही. सोबतच एलआयसी कर्मचारी आठवड्याचे 5 दिवसच काम करणार आहेत.

Advertisement

महत्त्वाच्या घोषणा
– एलआयसी कर्मचार्‍यांना १६ % पगारवाढ
– दरमहा 1500 ते 13500 रुपये स्पेशल अलाऊंस
– डीए 6352 पॉईंट्सवर
– पाच दिवसांचा कामाचा आठवडा

Advertisement

मीडिया रिपोर्ट्सनुसार, एलआयसी आता यावर्षी देशातील सर्वात मोठा आयपीओ घेऊन येण्याच्या तयारीत आहे. केंद्र सरकार एलआयसीच्या आयपीओमधून 1 लाख कोटी रूपये जमा करण्याच्या विचारात आहे. तसेच त्यांच्या १० % वाटा विकण्याची शक्यता आहे. सध्या 29 कोटी पॉलिसींसोबत जीवन वीमा कंपनीचा पेड अप कॅपिटल 100 कोटी रूपये आहे. एलआयसीची सुरूवात 1956 साली 5 कोटी रूपयांसह झाली होती. आता एलआयची संपत्ती 31,96,214.81 कोटी रुपये आहे.

संपादन : सोनाली पवार

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply