Take a fresh look at your lifestyle.

घर सजावट आणि आरोग्य : ‘त्या’ चार झाडांची रोपे देतील ‘सुकून की निंद’..!

पुणे :

Advertisement

धकाधकीच्या जीवनात आनंद, सुख आणि समाधान यासह शांत झोप या गोष्टी दुर्मिळ होत आहेत. त्यामुळेच आता आपल्या जीवनशैलीत काही बदल करून आणि घराच्या सजावटीत आरोग्यपूर्ण असे बदल करून ‘सुकून की निंद’ मिळवण्याची माहिती आपण आज पाहणार आहोत. फ़क़्त अशी रोपटे लावून जादूची कांडी फिरवल्यासारखा बदल होणार नाही. मात्र, यामुळे तुमच्या मेंदूला आल्हाददायक वाटून शांत झोप नेण्यासह आनंद, सुख आणि समाधानाची अनुभूती आणखी जास्त क्रियाशील होईल की..

Advertisement

एका संशोधनानुसार झोपेची समस्या देखील हृदयरोगास कारणीभूत ठरू शकते असे सिद्ध झालेले आहे. तसेच जे लोक ऑफिसमध्ये उशीर करतात, त्यांच्यात तणाव वाढण्याचा धोकाही असतो. अपूर्ण झोपेचे प्रमुख कारण म्हणजे रात्री उशिरापर्यंत गॅझेटमध्ये खेळत राहणे. अशा परिस्थितीत जीवनशैली बदलून या समस्येवर मात केली जाऊ शकते. या व्यतिरिक्त अशी काही वनस्पती आहेत ज्यात निद्रानाश कमी करून मानसिक ताणतणाव कमी होतो. त्यांच्याबद्दल जाणून घ्या…

Advertisement

लव्हेंडर वनस्पती : लैव्हेंडर तेलाचा वास मनाचा ताण कमी करतो आणि आरामदायक वाटते. म्हणूनच काही लोक आपल्या घराचे वातावरण सुखद करण्यासाठी लैव्हेंडर एअर फ्रेशनर देखील वापरतात. त्याचा सौम्य सुगंध घराच्या वातावरणाला सकारात्मक उर्जा देते. आपणही बेडरूमजवळ लव्हेंडर वनस्पती लावा. याने आपल्याला अधिक चांगले आणि आरामदायक झोप येईल.

Advertisement

स्नॅक प्लांट : घराचे सौंदर्य वाढवण्यासाठी बहुतेक लोक त्यांच्या घरी स्नॅक्स प्लांट (सापासारखी पाने असलेली वनस्पती) लावतात. याने घराचे सौंदर्य वाढण्यासह चांगली झोप येण्यासही मदत होते. याव्यतिरिक्त ही वनस्पती घरगुती वातावरणास प्रदूषित हवेपासून संरक्षण देते आणि आपल्याला आल्हाददायक वाटते.

Advertisement

कोरफड वनस्पती : कोरफड वनस्पती ही सर्रास कुठेही असते. रानावनात ही आढळते. हिचे रोपटे जास्त वाढत नसल्याने आपण खोलीच्या कोणत्याही कोपऱ्यात सहजपणे ठेवू शकता. कोरफड रात्री ऑक्सिजन सोडतो, ज्याचा आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. यामुळे आपल्याला चांगली झोप देखील येते. याशिवाय त्वचेला उजळ करण्यासाठी आणि डाग कमी करण्यासाठीही कोरफडचा वापर केला जातो.

Advertisement

चमेली वनस्पती : आपल्या घरात चमेलीची रोपे असल्यास त्याच्या फुलांचा सुगंध केवळ आपला मानसिक ताण कमी करण्यासच नव्हे तर चांगली झोप घेण्यासदेखील मदत करतो.

Advertisement

संपादन : माधुरी सचिन चोभे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply