Take a fresh look at your lifestyle.

आणि म्हणून पाकिस्तानने घातली फेसबुक, युट्युब, ट्विटर, व्हाटस्अपवरही बंदी; पहा नेमका काय घेतलाय निर्णय

दिल्ली :

Advertisement

पाकिस्तानमध्ये ट्विटर (twitter), फेसबुक (Facebook), यूट्यूब (YouTube), व्हॉट्सअ‍ॅप (whats app), टिकटॉक (tik tok) आणि टेलिग्राम (telegram) अशा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातली आहे. सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत या सोशल मीडिया अॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे. पाकिस्तानच्या गृह मंत्रालयाने शुक्रवारी ही माहिती दिली.

Advertisement

पाकिस्तान मंत्रालयाने म्हटले आहे की पाकिस्तान दूरसंचार प्राधिकरणाने (पीटीए) दिशा-निर्देश देऊन या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातली आहे. पाकिस्तानच्या गृह मंत्रालयाने पीटीएला हे अॅप्स ब्लॉक करण्याचे निर्देश दिले आहेत. पाकिस्तानी माध्यमांच्या वृत्तानुसार एका स्थानिक राजकीय पक्षाने हिंसाचार केल्यानंतर कायदा व सुव्यवस्था राखण्याचा हेतूने या कायद्याचा आधार घेऊन ही कार्यवाही करण्यात आलेली आहे.

Advertisement

पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या राजकीय विरोधाच्या पार्श्वभूमीवर असा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे. परिस्थिती हाताळण्यात अयशस्वी ठरलेल्या पाकिस्तान सरकारने आता लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंदी घातली आहे. पाकिस्तानमध्ये सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये पाकिस्तानी पोलिस दरोडेखोरांसमोर गुडघे टेकत आहेत. अशावेळी पंतप्रधान इम्रान खान सरकारने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यावरूनही आता तिकडे गदारोळ चालू झाला आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे  

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply