Take a fresh look at your lifestyle.

अहमदनगर सर्वेक्षण : ‘झेडपी’बाबत नागरिकांचे आहे ‘हे’ मत; पंचायत समितीबाबत म्हटले जातेय ‘असे’..!

अहमदनगर :

Advertisement

‘अहमदनगर जिल्हा राजकीय – सामाजिक सर्वेक्षण 2021’चा जिल्हानिहाय माहितीचा अहवाल आम्ही प्रसिद्ध करीत आहोत. प्रथम आपण जिल्हा पातळीवरून लोकांचा काय कौल आहे तो समजून घेणार आहोत. यामध्ये जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य यांच्यासह खासदार व आमदार यांच्या कामाबाबत जनतेचे नेमके काय म्हणणे आहे हे आपण पाहणार आहोत. जिल्हास्तरीय मुद्दे झाल्यावर मग जिल्ह्यातील एकूण 12 विधानसभा मतदारसंघातून जनतेने काय कौल दिला आहे, याचेही विश्लेषण वाचकांसाठी आम्ही प्रसिद्ध करणार आहोत.

Advertisement

‘अहमदनगर जिल्हा परिषदेच्या कामाबाबत आपण कितपत समाधानी आहात’ या प्रश्नावर सर्वच सहभागी युझर्सने आपले मत मांडले आहे. त्यातील फ़क़्त 19.4 % युझर्सने खूप समाधानी असे म्हटले आहे. तर, समाधानी असून त्यांच्या कामकाजात सुधारणा अपेक्षित असल्याचे 48.4 टक्के लोकांनी म्हटलेले आहे. यासह अहमदनगर जिल्हा परिषदेचे कामकाज अजिबात समाधानकारक नसल्याचे तब्बल 32.3 टक्के नागरिकांना वाटत आहे. अहमदनगर महानगरपालिकेच्या कामकाजाबाबत तर खूप लोकांनी असमाधान व्यक्त केले आहे. तब्बल 61.3 टक्के नगरकरांनी महापालिका कारभारावर असमाधान अशी टिपणी केली आहे. (याबाबत स्वतंत्र बातमी पुढे येणार आहे)

Advertisement

अहमदनगर जिल्हा परिषदेच्या कामाबाबत आपण कितपत समाधानी आहात?

Advertisement
खूप समाधानीसमाधानीअसमाधानी
19.4 %48.4 %32.3 %

जिल्हा परिषद सदस्यांच्या कामगिरीवर 48.3 टक्के नागरिकांनी समाधानी असल्याचे सांगतातच 51.7 टक्के लोकांनी अजिबात समाधानी नसल्याचे म्हटलेले आहे. जिल्हा परिषदेला थेट निधी सध्या पंधराव्या वित्त आयोगातून मिळत नसल्याने जिल्हा परिषद सदस्यांना आता तितका निधी मिळत नाही. तसेच जिल्हा नियोजन समितीमध्ये आमदार-खासदारांनी निधी पळवण्याचा सपाटा लावल्याने निधी आणखी कमी झालेला आहे. त्यामुळे अनेकांनी असमाधान व्यक्त केले आहे.

Advertisement

जिल्हा परिषद सदस्यांच्या कामगिरीवर आपण समाधानी आहात का?

Advertisement
होयनाही
48.3 %51.7 %

जिल्हा परिषद सदस्यांपेक्षाही वाईट परिस्थिती सध्या पंचायत समिती सदस्यांची आहे. तब्बल 71.4 टक्के लोकांनी आपल्या पंचायत समिती सदस्यांच्या कामावर नाराजी व्यक्त केली आहे. तर, फ़क़्त 28.6 टक्के सदस्य तालुका पंचायत समितीच्या सदस्यांवर किमान समाधानी आहेत. गावपातळीवर सरपंच पदाबाबतही अशीच परिस्थिती आहे. पंचायत राज व्यवस्थेनुसार महाराष्ट्रात त्रिस्तरीय रचना आहे. त्यातील तळाचा घटक म्हणजे ग्रामपंचायत. अहमदनगर जिल्ह्यातील 55.6 टक्के जनता आपल्या सरपंचांवर समाधानी आहे. तर, 44.4 टक्के लोकांनी ग्रामपंचायतीबद्दल नाराजीची भावना व्यक्त केली आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे (क्रमशः)

Advertisement

पुढील विश्लेषण प्रसिद्ध होण्याचे वेळापत्रक असे :

Advertisement
सर्वेक्षणाच्या विश्लेषणातील बातमीचा विषयप्रकाशित होण्याचा संभाव्य दिनांक
खासदार व आमदार यांच्या कामाबाबतदि. 16 एप्रिल 2021
जिल्ह्यातील विकास कामाबाबतची भावनादि. 17 एप्रिल 2021
शहरी भाग (महापालिका / नगरपालिका) कामाबाबत मुद्देदि. 18 एप्रिल 2021
विधानसभा मतदारसंघ : अकोलेदि. 19 एप्रिल 2021
विधानसभा मतदारसंघ : कोपरगावदि. 20 एप्रिल 2021
विधानसभा मतदारसंघ : संगमनेरदि. 21 एप्रिल 2021
विधानसभा मतदारसंघ : शिर्डी (राहता)दि. 22 एप्रिल 2021
विधानसभा मतदारसंघ : श्रीरामपूरदि. 23 एप्रिल 2021
विधानसभा मतदारसंघ : नेवासादि. 24 एप्रिल 2021
विधानसभा मतदारसंघ : राहुरीदि. 25 एप्रिल 2021
विधानसभा मतदारसंघ : शेवगाव-पाथर्डीदि. 26 एप्रिल 2021
विधानसभा मतदारसंघ : कर्जत-जामखेडदि. 27 एप्रिल 2021
विधानसभा मतदारसंघ : श्रीगोंदादि. 28 एप्रिल 2021
विधानसभा मतदारसंघ : पारनेरदि. 29 एप्रिल 2021
विधानसभा मतदारसंघ : अहमदनगर शहरदि. 30 एप्रिल 2021
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply