Take a fresh look at your lifestyle.

अशी घ्या काळजी; मोबाईलमध्ये ‘ही’ माहिती ठेवाल, तर बँक खातं होईल झटक्यात खाली..!

पुणे :
बँक खात्यावर पैसे ठेवले की आपण निर्धास्त होतो. मात्र, आता चोरही हुशार झालेत.. रात्री-बेरात्री जागरण करून बँक फोडण्याचे कष्ट आता तेही घेत नाहीत. बसल्या जागेवर थोडेसे डोके वापरून, ते तुम्हाला कधी चुना लावतील, हेही समजणार नाही. त्यामुळे बँकेत पैसे ठेवले, म्हणजे काळजी मिटली, असे तुम्हाला वाटत असेल, तर आताच सावध व्हा. कारण, तुमची एक चूक तुमचे बँक खाते (bank account) रिकामे करू शकते. बँक खात्यात पैसे असले, तरी तुम्ही काय काळजी घ्यायला हवी, याबाबत जाणून घेऊ या..

Advertisement

सध्या बँकांच्या फसवणुकीचे प्रकार वाढत असल्याने स्टेट बँक ऑफ इंडिया (state bank of India)च्या संकेतस्थळावर खातेदारांना सावधानतेचा इशारा दिला आहे. तसेच या चोरांपासून सुरक्षित राहण्यासाठी काय काळजी घ्यायला हवी, याबाबत माहिती दिली आहे.

Advertisement

बँकेचे तपशील मोबाईलमध्ये सेव्ह करू नका!
तुमच्या बँक खात्यावर हॅकरचा बारीक डोळा आहे. तुम्ही सावध न राहिल्यास आपली माहिती सहज लीक होऊ शकते आणि हॅकर्स तुमच्या खात्यातील पैशांवर कधी डल्ला मारतील, हे तुम्हालाही समजणार नाही. ग्राहकांची अशी फसवणूक होऊ नये, यासाठी बँकेने काही सूचना केल्या आहेत. आपल्या स्मार्टफोनमध्ये (mobile) कधीही बँकेचे तपशील सेव्ह करू नयेत. बँक खातेक्रमांक (account number), पासवर्ड (password), एटीएम कार्डाचा क्रमांक (ATM card number) किंवा त्याचा फोटो फोनमध्ये जपून ठेवल्यास ही माहिती लीक होण्याचा धोका असतो. शिवाय एटीएमचा पिनकोड (ATM PIN) सेव्ह केल्याने खासगी माहिती चोरून खात्यातून चोरी होण्याचा धोका वाढतो.

Advertisement

अनोळखी व्यक्तीला बँकेचे तपशील देऊ नका..
कोणालाही मोबाईलवर आलेला ओटीपी (वन टाईम पासवर्ड OTP), पिन क्रमांक, डेबिट किंवा क्रेडिट कार्डाचा (debit / credit cards) क्रमांक किंवा सीव्हीव्ही क्रमांक कधीही सांगू नका. बहुतेक जणांची फसवणुक अशाच प्रकारे होते. अनेकदा बँकेच्या नावाने आपल्याला फोन येतो. कार्ड ब्लॉक (card block) करण्याची भीती दाखवून, पासवर्ड बदलण्यासाठी आपल्याकडून ओटीपी किंवा सीव्हीव्ही काढून घेतला जातो. खातेदारांनी अशा फोन कॉलपासून सावध राहण्याचा सल्ला बँकांनी दिला आहे.

Advertisement

दुसऱ्याच्या हाती एटीएम कार्ड देऊ नका..
आपल्या एटीएम कार्डाचा वापर नेहमी स्वतःच करा. इतरांची मदत शक्यतो घेऊ नका. तसेच एटीएम कार्डाचे तपशील कोणालाही देऊ नका. असे केल्याने आपल्या खात्याची माहिती लीक होऊ शकते. ग्राहकांनी पब्लिक डिव्हाईस, ओपन नेटवर्क किंवा मोफत वायफायशी (free WiFi) जोडून ऑनलाईन व्यवहार करू नयेत. बँकांनुसार पब्लिक डिव्हाईजचा वापर केल्याने ग्राहकांची माहिती लीक होऊ शकते. लहानश्या चुकीने काळजीत पडण्यापेक्षा आधीच काळजी घ्या..
संपादन : सोनाली पवार

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply