Take a fresh look at your lifestyle.

म्हणून सिटी बँकेने घेतला बोरिया बिस्तर आवरण्याचा निर्णय; ग्राहक-नोकरदारांवर होणार ‘हा’ परिणाम

मुंबई :

Advertisement

अमेरिकाची प्रमुख  आणि बलाढ्य वित्तीय संस्था असलेल्या सिटी बँकेने गुरुवारी भारतातील बँकिंग व्यवसायातून (सिटीबँक एक्झिट / citibank to exit from consumer business) बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. सिटी बँकने केवळ भारतच नव्हे तर जगभरातील एकूण 13 देशांतून ग्राहक बँकिंग व्यवसायातून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. जागतिक रणनीतीचा भाग म्हणून बँकेने हे पाऊल उचलले आहे.

Advertisement

बँकेच्या व्यवसायांमध्ये क्रेडिट कार्ड्स (credit cards), रिटेल बँकिंग (retail banking), गृह कर्जे (home loans) आणि मालमत्ता व्यवस्थापन (asset management) यांचा समावेश आहे. सिटी बँकेच्या या कारवाईनंतर बँकेच्या कर्मचार्‍यांचे काय होईल असा एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सिटी बँकच्या भारतात एकूण 35 शाखा आहेत आणि ग्राहक बँकिंग व्यवसायात सुमारे 4 हजार कर्मचारी कार्यरत आहेत. सिटी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशु खुल्लर म्हणाले आहेत की, या निर्णयाचा भारतातील बँक आणि बँकेच्या कर्मचार्‍यांवर परिणाम होणार नाही. म्हणजेच, बँकेचे कर्मचारी काम करत राहतील आणि त्याच वेळी बँक आपल्या सर्व ग्राहकांना पूर्वीप्रमाणे सेवा पुरवत राहील.

Advertisement

सध्या सिटी बँकेतील कर्मचार्‍यांची नोकरी (salaried employee) सुरक्षित आहे. पण येत्या काही वर्षात कंपनीतील कर्मचार्‍यांचे काय होईल असाही प्रश्न कायम आहे. सिटीबँकने म्हटले आहे की, ते भारतात कामकाजासाठी खरेदीदार शोधत आहेत. काही बँक अधिका-यांनी मनीकंट्रोलला सांगितले आहे की, केवळ बँक भारतबाहेर जात आहे आणि भारतात ग्राहकांचा व्यवसाय बंद करणार नाही. अशा परिस्थितीत सिटीबँकच्या भारताबाहेर जाण्याच्या निर्णयाचा बँकेच्या कर्मचार्‍यांवर किंवा बँकेच्या ग्राहकांवर परिणाम होणार नाही.

Advertisement

मुख्य कार्यकारी अधिकारी आशु खुल्लर म्हणाले की, आमच्या ग्राहकांची सेवा तशाच प्रकारे करीत राहणार आहोत. उलट आजच्या घोषणेने बँकेच्या सेवा आणखी मजबूत करण्यात येतील. संस्थात्मक बँकिंग व्यवसायाव्यतिरिक्त सिटी मुंबई, पुणे, बेंगळुरू, चेन्नई आणि गुरुग्राम केंद्रांमधून जागतिक व्यवसायावर लक्ष केंद्रित करणार आहे. इसवी सन 1902 मध्ये सिटी बँकने भारतात येऊन 1985  मध्ये बँकेने ग्राहक बँकिंग व्यवसाय सुरू केला होता.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply