Take a fresh look at your lifestyle.

दानधर्मातही धोका; श्रीराम मंदिरासाठी दिलेले ‘इतक्या’ कोटींचे चेक ‘बाउन्स’..!

मुंबई :
अयोध्येत भव्य श्रीराम मंदिर (ayodhya shriram mandir / temple) व्हावे, यासाठी अनेकांनी रक्त सांडले.. न्यायालयीन लढाई लढली गेली.. रस्त्यावर लोक आले. प्रदीर्घ अशा लढाईनंतर अखेर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला नि श्रीराम मंदिराचा मार्ग मोकळा झाला.. मंदिराच्या भव्य निर्माणासाठी विविध हिंदुत्ववादी संघटना घरोघरी जाऊन निधी गोळा करीत आहेत. भारतासह जगभरातील भाविक सढळ हाताने, शक्य तशी आर्थिक मदत करीत आहेत. वेगवेगळ्या संघटना, राजकीय पक्षांनी मंदिरासाठी निधी गोळा करण्यासाठी मोहिमा हाती घेतल्या.

Advertisement

विश्व हिंदू परिषदेनेही मंदिरासाठी निधी गोळा करण्यासाठी एक मोहीम हाती घेतली. या मोहिमेदरम्यान त्यांना अनेकांनी चेक (bank cheque / धनादेश) पाठवले. मात्र, त्यातील जवळपास 15 हजार चेक बँकेत वठलेच नाहीत. या चेकची एकत्रित रक्कम सुमारे 22 कोटींच्या घरात असल्याचं समजते. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राने केलेल्या ऑडिटमध्ये ही बाब निदर्शनास आली. ज्या लोकांनी निधीसाठी चेक दिले, त्यांच्या खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने, किंवा तांत्रिक बाबींमुळे हा प्रकार घडला असावा, असं ऑडिट रिपोर्टमध्ये (audit report) म्हटले आहे.

Advertisement

मंदिराच्या निर्माणासाठी नेमलेल्या न्यासाचे सदस्य डॉ. अनिल मिश्रा यांनी सांगितले, की चेक न वठण्यात तांत्रिक अडचण असल्यास बँका ती दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत. विशेष म्हणजे, न वठलेल्या चेकपैकी 2 हजार चेक हे अयोध्येमधीलच आहेत. विश्व हिंदू परिषदेच्या निधी गोळा करण्याच्या मोहिमेदम्यान हे चेक जमा करण्यात आले होते. विहिंपने 15 जानेवारी ते 17 फेब्रुवारी ही मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेदरम्यान 5 हजार कोटींचा निधी जमा झाल्याचे कळते. मंदिरासाठी तयार करण्यात आलेल्या न्यासाकडून निधीद्वारे एकूण किती रक्कम गोळा झाली, याबाबतचे आकडे जारी केलेले नाहीत.

Advertisement

दरम्यान, राम मंदिराच्या निर्माणासाठी एकूण 107 एकर जमीन उपलब्ध व्हावी, यासाठी न्यासाचे प्रयत्न सुरू आहेत. प्रभू श्रीरामाचे मंदीर 5 एकर जमिनीवर उभारण्यात येणार असून, उर्वरीत जमिनीवर संग्रहालय आणि वाचनालय उभारण्यात येणार आहे. मंदिर निर्माणासाठीच्या निधी संकलनाद्वारे 4 मार्चपर्यंत 2500 कोटींची रक्कम जमा झाल्याची माहिती श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी दिली.

Advertisement

संपादन : सोनाली पवार

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply