Take a fresh look at your lifestyle.

बीसीसीआयने केली खेळाडूंच्या वार्षिक कराराची घोषणा; पहा कोणाला मिळणार किती कोटी..!

मुंबई :
बीसीसीआयने ऑक्टोबर २०२० ते सप्टेंबर २०२१ या कालावधीत भारतीय खेळाडूंच्या ज्येष्ठ संघासाठी वार्षिक कराराची घोषणा केली आहे. ग्रेड ए प्लसमध्ये कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह, तर ग्रेड अ मध्ये ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्यासह १० खेळाडूंचा समावेश आहे. भुवनेश्वर कुमार आणि शार्दुल ठाकूर यांना ग्रेड बीमध्ये स्थान देण्यात आले आहे. सीराजला ग्रेड सी मध्ये आपले स्थान मिळविण्यात यश आले आहे.

Advertisement

अ + दर्जाच्या वर्गात असल्याने विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना वर्षाकाठी ७ कोटी रुपये मिळतील. त्याचबरोबर ग्रेड ए च्या खेळाडूंना ५ कोटी आणि ग्रेड सी मधील खेळाडूंना ३ कोटी रुपये वार्षिक दिले जातील. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्ध शानदार प्रदर्शन करणारे मोहम्मद सिराज आणि अक्षर पटेल यांना ग्रेड सीच्या आत स्थान देण्यात आले आहे. युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांनाही ग्रेड सीमध्ये समाविष्ट केले आहे, त्यानुसार त्यांना वर्षाकाठी १ कोटी रुपये मिळतील.

Advertisement

भारतीय संघाची कामगिरी नुकतीच चांगली झाली आहे. ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मैदानावर पराभूत केल्यानंतर टीम इंडियाने घरच्या मालिकेत इंग्लंडचा पराभव केला. संघाच्या वतीने मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर या तरूण खेळाडूंनी जबरदस्त खेळ दाखविला. इंग्लंडविरुद्धच्या तीनही कसोटी, टी २० आणि एकदिवसीय मालिका भारताने जिंकल्या होत्या. 
संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply