Take a fresh look at your lifestyle.

IPL 2021 : राजस्थान-दिल्लीच्या सामन्यापूर्वी वसीम जाफरचे मजेदार ट्वीट..!

मुंबई :
दिल्ली कॅपिटल आणि राजस्थान रॉयल्सच्या सामन्यापूर्वी वसीम जाफरने एक मजेदार ट्विट केले आहे. रविचंद्रन अश्विन आणि जोस बटलर यांच्याबाबत त्यांनी हे ट्विट केले आहे. वसीम जाफर आयपीएल २०२१ मध्ये पंजाबच्या कोचिंग स्टाफमध्ये आहे. २०२० पासून तो फलंदाजी सल्लागार म्हणून पंजाबशी संबंधित आहे. आयपीएल २०२१ मध्ये पंजाबने विजयासह आपली मोहीम सुरू केली. पहिल्या सामन्यात पंजाबने रंगतदार सामन्यात राजस्थान रॉयल्सचा पराभव केला.

Advertisement

जाफरने लगान या बॉलिवूड चित्रपटाचे स्क्रीनशॉट ट्विट करुन शेअर केले आहेत. यात एक युवा खेळाडू ब्रिटिश खेळाडूने ‘मांकड’ आऊट (म्हणजेच नॉन स्ट्रायकरचा खेळाडू बॉल पडण्यापूर्वी स्क्रीजसोडून पुढे गेल्यावर बॉलरने रनआऊट करणे) केले. ही प्रतिमा पोस्ट केल्यानंतर, जाफरने कॅप्शनमध्ये लिहिले, आज रात्री या दोघांना पहा. याचे कारण असे की, आयपीएल २०१९ मध्ये रविचंद्रन अश्विनने पंजाबकडून खेळताना राजस्थान रॉयल्सचा फलंदाज जोस बटलरला कोणताही इशारा न देता मानकड आऊट केले होते.

Advertisement

Wasim Jaffer on Twitter: “Watchout for these two tonight 😆 #RRvsDC #IPL2021 https://t.co/Qa2v7lSc44” / Twitter

Advertisement

अश्विन आयपीएल २०२१ मध्ये दिल्ली कॅपिटलकडून खेळत आहे. आज हे दोघे पुन्हा एकदा आमनेसामने असतील. याशिवाय आणखी एक प्रतिमा शेअर करताना जाफरने कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, भुलू नका, आत रहा, सुरक्षित रहा. आज पुन्हा एकदा अश्विन गोलंदाजी करेल तेव्हा जर नॉन-स्ट्रायकरला जोस बटलर असेल तर तो नक्कीच काळजी घेईल, असे म्हटले आहे. दिल्ली व राजस्थान यांच्यात आज सायंकाळी ७.३० पासून मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर स्पर्धा होईल. 
संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement

Wasim Jaffer on Twitter: “Don’t wander out. Stay in, stay safe. 😉 #RRvsDC #IPL2021” / Twitter

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply