Take a fresh look at your lifestyle.

IPL 2021 : म्हणून कोहलीने काढला खुर्चीवरच राग; व्हायरल झालाय व्हिडिओ

मुंबई :
आयपीएल २०२१ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (आरसीबी) बुधवारी सनरायझर्स हैदराबादशी (एसआरएच) सामना झाला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या विराट कोहलीच्या संघाने २० षटकांत ८ गडी गमावून १४९ धावा केल्या. प्रत्युत्तरात हैदराबादचा संघ २० षटकांत ९ विकेट गमावून केवळ १४३ धावा करू शकला आणि त्यांनी सामना ६ धावांनी गमावला. आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने २९ चेंडूत अवघ्या ३३ केल्या. बाद झाल्यावर विराट जेव्हा पॅव्हेलियनमध्ये परतला तेव्हा त्याला राग आला. त्याने तिथे ठेवलेल्या खुर्चीवर आपला राग काढला.

Advertisement

व्हिडिओ पहा

Advertisement

प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केल्यानंतर ग्लेन मॅक्सवेलच्या अर्धशतकानंतरही आरसीबीचा संघ २० षटकांत आठ बाद १४९ धावा करू शकला. मॅक्सवेलने ४१ चेंडूत पाच चौकार व तीन षटकारांच्या मदतीने ५९ धावा केल्या. प्रत्युत्तरात हैदराबादने १३ षटकांत ९६ धावांची मजल मारली होती आणि ते विजयाच्या दिशेने जात होते. त्यांना आता विजयासाठी ४२ चेंडूंत ५४ धावांची गरज होती आणि त्यांच्याकडे नऊ विकेट शिल्लक होत्या. परंतु हैदराबादचा संघ २० षटकांत ९ बाद १४३ धावा करू शकला आणि सामना ६ धावांनी गमावला.

Advertisement

१४९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादने रिद्धिमान साहा (१) ची विकेट स्वस्तात गमावली, परंतु यानंतर कर्णधार डेव्हिड वॉर्नर (५४) आणि मनीष पांडे (३८) यांनी दुसऱ्या विकेटसाठी ८३ धावांची भर घालून आपल्या संघाला मजबूत स्थान मिळवून दिले. ही भागीदारी काइल जेम्सनने १४ व्या षटकात तोडली, वॉर्नर ख्रिश्चनकडे झेल देवून बाद झाला. हैदराबादला विजयासाठी अंतिम २४ चेंडूत ३५ धावांची गरज होती.

Advertisement

शाहबाज अहमदने १७ व्या षटकात तीन गडी बाद केले. या षटकातील पहिल्या दोन चेंडूंवर जॉनी बेयरस्टो (१२) आणि मनीष पांडे (३८) खराब फटकेबाजी करताना झेलबाद झाले, तर अब्दुल समद (०) शेवटच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झाला. पुढच्या दोन षटकांत हैदराबादने आणखी दोन बळी गमावले. प्रथम विजय शंकरला हर्षल पटेलने आणि त्यानंतर महंमद सिराजने जेसन होल्डर यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. हैदराबादला शेवटच्या षटकात १६ धावांची आवश्यकता होती आणि पहिल्या तीन चेंडूंमध्ये आठ धावा आल्या. चौथ्या चेंडूवर रशीद खान (१७) धावबाद झाला आणि पाचव्या चेंडूवर शहबाज नदीम (०) हर्षल पटेलच्या हाती बाद झाला आणि हैदराबादच्या विजयाच्या आशा संपविल्या.
संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply