Take a fresh look at your lifestyle.

हा आहे ‘अहमदनगर’चा दृष्टीकोन; ‘अहमदनगर जिल्हा राजकीय – सामाजिक सर्वेक्षण २०२१’च्या अहवालात 990 युझर्सचा सहभाग

अहमदनगर :

Advertisement

जिल्ह्यातील सामाजिक व राजकीयदृष्ट्या कल जाणून घेण्यासह समस्यांचा वेध घेण्याचा प्रयत्न म्हणून ‘कृषीरंग’ व ‘राज्यकर्ता’ या दोन न्यूज पोर्टलने सर्वेक्षण हाती घेतले होते. दि. 1 मार्च ते 15 एप्रिल या कालावधीत झालेल्या या ऑनलाईन सर्वेक्षणात नगर जिल्ह्यातील 990 फेसबुक व गुगल युझर्सने सहभाग घेतला. सर्व तालुक्यातील आणि सर्व वयोगटातील युझर्सने यामध्ये आपले मत व्यक्त केले आहे. त्याचाच सर्वेक्षण अहवाल उद्यापासून सविस्तरपणे प्रसिद्ध केला जाणार आहे.

Advertisement

या सर्वेक्षणातील महत्वाचे मुद्दे असे :

Advertisement
  1. नगर जिल्ह्यातील 990 फेसबुक व गुगल युझर्सचा सहभाग
  2. दि. 1 मार्च ते 15 एप्रिल या कालावधीत झाले ऑनलाईन पद्धातीने सर्वेक्षण
  3. जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका व नगरपालिका स्तरावरील नागरिकांचा सहभाग
  4. जिल्ह्यातील झालेली विकासकामे आणि त्यामध्ये राहिलेल्या त्रुटींवरही नागरिकांनी मांडले मत
  5. खासदार, स्थानिक आमदार, झेडपी सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, व ग्रामपंचायत स्तरावरील नेतृत्वाबद्दलही नागरिकांनी मांडले स्पष्ट मत
  6. पुढील निवडणुकीत मतदान करताना कोणकोणत्या गोष्टींना प्राधान्य देणार यावरही टाकला नागरिकांनी प्रकाशझोत
  7. राज्य व देशपातळीवर सुरू असलेल्या राजकीय, आर्थिक व सामाजिक घडामोडींवरही व्यक्त केले मत

सर्वेक्षणात विधानसभा मतदारसंघनिहाय सहभागी झालेले नागरिक असे :

Advertisement
विधानसभा मतदारसंघ नाव सहभागी युझर्स
पारनेर-नगर98
श्रीगोंदा95
अहमदनगर109
कर्जत-जामखेड87
शेवगाव-पाथर्डी74
नेवासा83
श्रीरामपूर76
राहता (शिर्डी)86
कोपरगाव58
संगमनेर64
अकोले59
राहुरी101
एकूण990

संपादन : सचिन मोहन चोभे (क्रमशः)

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply