Take a fresh look at your lifestyle.

तर, भाजप वाटणार मोफत रेमडेसिवीर; पहा कसा सविनय कायदेभंग केला जाणार..!

मुंबई :

Advertisement

सध्या राज्यात करोना लस आणि रेमडेसिवीर असा दोन्हींचा अभूतपूर्व असा तुटवडा आहे. त्यावर महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपमध्ये कलगीतुरा चालू झालेला आहे. परिणामी हा प्रश्न सुटण्याऐवजी आणखी जटील होत आहे. याच मुद्द्याला सोडवण्यासाठी आज विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मंत्री राजेंद्र शिंगणे यांची भेट घेतली आहे.

Advertisement

Pravin Darekar – प्रविण दरेकर on Twitter: “कोरोना रुग्णांची राज्यातील वाढणारी संख्या, #remdesivir चा निर्माण झालेला प्रचंड तुटवडा आणि इंजेक्शनची मागणी या सर्व गोष्टींचा विचार करून ज्या निर्यातदार कंपन्या महाराष्ट्राला #remdesivir इंजेक्शनचा पुरवठा करण्यास तयार आहेत व ज्यांनी महाराष्ट्र शासनाकडे परवानगी मागितली आहे, https://t.co/KsNkPVpqit” / Twitter

Advertisement

त्यानंतर त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, कोरोना रुग्णांची राज्यातील वाढणारी संख्या, रेमडेसिवीरचा निर्माण झालेला प्रचंड तुटवडा आणि इंजेक्शनची मागणी या सर्व गोष्टींचा विचार करून ज्या निर्यातदार कंपन्या महाराष्ट्राला इंजेक्शनचा पुरवठा करण्यास तयार आहेत व ज्यांनी महाराष्ट्र शासनाकडे परवानगी मागितली आहे. अशा कंपन्यांना पुरवठा करण्यास युद्धपातळीवर परवानगी द्यावी व रुग्णांना तातडीने इंजेक्शन उपलब्ध करून द्यावे, यासाठी आज मंत्री राजेंद्र शिंगणे यांची भेट घेतली. त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. पण जर सरकारने परवानगी दिली नाही तर सविनय कायदेभंग करून आम्ही महाराष्ट्रात रुग्णांना रेमडेसिवीरचे वाटप करू, असा इशाराही आम्ही सरकारला दिला आहे.

Advertisement

एकूणच महाराष्ट्र सरकारला सोडून थेट भाजप नेत्यांना आता औषध कंपन्या संपर्क करीत आहेत. त्याचे नेमके काय गौडबंगाल आहे याचीही चर्चा यानिमित्ताने सुरू झालेली आहे. रेमडेसिवीरचा तुटवडा राजकीय कारणासाठी तर नाही ना, अशीही शंका उपस्थित होत असतानाच भाजपने थेट हे औषध मोठ्या प्रमाणात आणण्याची तयारी केली आहे. तर, मग महाविकास आघाडी सरकारने हा पुरवठा करण्यासाठी थेट कंपन्यांकडे संपर्क न करण्याचे कारणही चर्चेत आलेले आहे.

Advertisement

संपादन : संतोष शिंदे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply