Take a fresh look at your lifestyle.

आणि बॅलेट बॉक्सच पळवला, तर झाशीमध्ये फाडल्या मतपत्रिका; पहा कुठे घडलाय हा प्रकार

दिल्ली :

Advertisement

सोशल मीडियामध्ये आणि विविध राष्ट्रीय माध्यमांनी वेळोवेळी उत्तरप्रदेशमध्ये कसा विकासात्मक बदल होत आहे याचे अहवाल सादर केलेले आहेत. त्याच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उत्तरप्रदेश राज्यात आज स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मतदान प्रक्रिया चालू आहे. त्यामध्ये एका ठिकाणी चक्क बॅलेट बॉक्स पळवण्यात आलेला असून झाशी भागात मतपत्रिका फाडण्यात आलेलेल्या आहेत.

Advertisement

यूपी पंचायत निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आग्रा जिल्ह्यातील फतेहाबाद तालुक्यातील रिहावली मतदान केंद्राच्या प्राथमिक शाळेच्या बूथवरुन दोन बॅलेट बॉक्समध्ये पळवण्यात आलेले आहेत. बोगस मतदानासंदर्भात दोन गटांचे समर्थक समोरासमोर आले आणि त्यांनी मतपत्रिका बॉक्स लुटल्याची घटना घडली आहे. बॅलेट लुटल्याची माहिती मिळताच पोलिस अधिकारी यांच्यासह जिल्हा अधिकारी व एसएसपी घटनास्थळी दाखल झाले असून त्याप्रकरणी कसून तपास सुरू झाला आहे.

Advertisement

झांसी जिल्ह्यातील काकरबाई पोलीस स्टेशन परिसरातील कैरोखर गावातही अशीच गडबड झाली आहे. मतदान केंद्रावर ठेवलेल्या मतपत्रिकेचा फडण्यासह खुर्च्या तोडण्यात आलेल्या आहेत. काही लोकांनी या भागात जोरदार दगडफेक केली. या गंभीर घटनेनंतर पोलिसांनी या केंद्राचे रूपांतर छावणीत केले आहे. सुमारे एक तासानंतर पोलिस दलाच्या उपस्थितीत पुन्हा मतदान सुरू झाले.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply