Take a fresh look at your lifestyle.

प्रचाराला आले अन ‘अवकाळी’ची पाहणी करून गेले; पहा अजितदादांनी काय दिलेत निर्देश

सोलापूर :

Advertisement

मंगळवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसामुळे जिल्ह्यात उन्हाळी पिके आणि द्राक्षे, आंबा, पपई, डाळिंब, केळी आदि फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. महसूल व कृषी विभागाकडून दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार ३ हजारहून अधिक हेक्टरवरील पिकांना फटका असून गावस्तरावर माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. त्याचवेळी पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत प्रचाराला आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्याच भागात नुकसानीची पाहणी करून तातडीने पंचनाम्याचे निर्देश दिले आहेत.

Advertisement

दि. १२ व १३ एप्रिल रोजी सायंकाळी जिल्ह्यातील अनेक गावांत वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्याकडे कोणत्याही मंत्री व लोकप्रतिनिधींनी विशेष लक्ष दिलेले नाही. त्यातच प्रचारासाठी म्हणून जिल्ह्यात आलेल्या उपमुख्यमंत्र्यांनी करकंब, बार्डी (ता. पंढरपूर) परिसरात बुधवारी दुपारी नुकसानीची पाहणी केली. त्यांनी तहसीलदार यांना तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, त्यांनी आदेश दिले तरी ही भरपाई शेतकऱ्यांना कधी मिळणार यावर अधिकारी किंवा नेत्यांनी भाष्य केलेले नाही.

Advertisement

वाऱ्यामुळे विवेक शिंगटे, दिलीप व्यवहारे यांच्या बेदाणा शेडवरील आच्छादन उडाल्याने बेदाणा भिजून नुकसान झाल्याच्या ठिकाणी अजितदादांनी जाऊन पाहणी केली. अामदार संजय शिंदे, सहकार शिरामेणी कारखान्याचे अध्यक्ष कल्याण काळे, रणजितसिंह शिंदे, करकंबचे उपसरपंच आदिनाथ देशमुख, बार्डीचे सरपंच अभिजित कवडे, राहुल पुरवत, पांडुरंग नगरकर, राहुल शिंगटे यांच्यासह शेतकरी या ठिकाणी उपस्थित होते. एकूणच सणात गण साजरे करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी करीत असल्याची चर्चा त्यामुळे सुरू झाली आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply