Take a fresh look at your lifestyle.

सचिन-कपिलनंतर ‘हा’ पुरस्कार मिळविणारा विराट ठरला तिसरा भारतीय..!

मुंबई :
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीची निवड २०१० च्या दशकाच्या सर्वोत्तम वनडे क्रिकेटपटूसाठी विस्डेनने केली आहे. ३२ वर्षीय कोहलीने श्रीलंकेविरुद्ध ऑगस्ट २००८ मध्ये एकदिवसीय सामन्यात प्रवेश केला होता. कोहली हा आतापर्यंतचा सर्वोत्तम फलंदाज आहे. त्याने २५४ एकदिवसीय सामन्यात १२ हजार १६९ धावा केल्या आहेत. २०११ ते २०२० या कालावधीत एकदिवसीय क्रिकेटमधील कामगिरीबद्दल विराट कोहलीला हा पुरस्कार देण्यात आला आहे. २०११ मध्ये विश्वचषक आणि २०१३ मध्ये चॅम्पियन्स करंडक जिंकणाऱ्या भारतीय संघाचादेखील तो भाग आहे.

Advertisement

२०१० च्या दशकात ६० च्या सरासरीने ११ हजार धावा केल्याबद्दल विराटने हा मान मिळविला आहे. या काळात त्याने ४२ शतके ठोकली. कपिल देव आणि सचिन तेंडुलकरनंतर विस्डेनचा हा मान मिळवणारा विराट कोहली हा तिसरा भारतीय क्रिकेटपटू आहे. विस्डेन म्हणाले, पहिल्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्याच्या ५० व्या वर्धापन दिनानिमित्त प्रत्येक दशकामधील पाच एकदिवसीय क्रिकेटपटूंची निवड करण्यात येते. सन १९७१ ते २०२१ या काळात दर दशकासाठी एक उत्कृष्ट क्रिकेटपटू निवडला गेला. २०१० च्या दशकात कोहलीची निवड करण्यात आली आहे.

Advertisement

गेल्या दशकात, आयसीसीतर्फे आयोजित केलेल्या ग्लोबल वन डे आंतरराष्ट्रीय स्पर्धांपैकी कोहली आणि भारतीय संघ उपांत्य सामन्याआधी कधीच बाहेर गेलेले नाहीत. १९९० च्या दशकात सचिन तेंडुलकरला सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून निवडले गेले. यावेळी सचिनने सलामीवीर म्हणून अनेक विक्रम नोंदवले. वर्ष १९९८ मध्ये सचिनने वनडेमध्ये ९ शतके ठोकली होती. कॅलेंडर वर्षात कोणत्याही फलंदाजाने केलेली ही सर्वाधिक शतके आहेत. कपिल देव यांना १९८० च्या दशकाचा सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून निवडण्यात आले. त्यांच्या नेतृत्वात भारताने १९८३ चा विश्वचषक जिंकला होता. ८० च्या दशकात कपिलने सर्वाधिक विकेट घेतल्या आणि सर्वाधिक स्ट्राइक रेटने एक हजाराहून अधिक धावा केल्या. 
संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply