Take a fresh look at your lifestyle.

‘राष्ट्रवादी व भाजप दोन्ही शेतकऱ्यांसाठी धोकादायक..’; संभाजी ब्रिगेडचे श्रीमंत कोकाटे यांचा आरोप

सोलापूर :

Advertisement

महाराष्ट्र नी देशात भाजप व राष्ट्रवादी हे दोन्हीही पक्ष धोकादायक असल्याची टीका संभाजी ब्रिगेडचे श्रीमंत कोकाटे यांनी केली आहे. शेतकरी संघटनेचे पंढरपूर पोटनिवडणुकीचे उमेदवार संतोष शिंदे पाटील यांच्या प्रचारार्थ मंगळवेढा शहरातील आठवडा बाजारात आयोजित सभेत त्यांनी दोन्ही राजकीय पक्षावर अनेक आरोप केले आहेत.

Advertisement

तसेच त्यांनी पुढे म्हटले की, केंद्र शासनाने शेतकऱ्यांच्या विरोधात कृषी कायदा किसान कायदा आणल्याने शेती उद्ध्वस्त होणार आहे. या कायद्यामुळे शेतकऱ्यांची जमीन शेतकऱ्यांची राहणार नाही. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने या शेतकरी विरोधी कायद्याला ठाम विरोध केलेला नाही. राष्ट्रवादीने संसदेत बाहेर पडून मोदी सरकारला मूक संमती दिली आहे. भाजपचे सरकार शेतकऱ्यांसाठी धोकादायक जसे आहे, तसेच राष्ट्रवादी हा पक्षही धोकादायक आहे.

Advertisement

महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना कोकाटे म्हणाले की, देशातील पश्चिम बंगाल आणि केरळ या राज्यांनी कृषी सुधारणा कायद्याच्या विरोधात राज्याचा कायदा केला आहे. महाराष्ट्रात तसा कायदा न करणारे महाविकास आघाडीचे सरकारही भाजप धार्जिणे असल्याची टीका कोकाटे यांनी केली आहे. कोकाटे यांनी म्हटले आहे की, राज्यभरात सामाजिक असंतोष पसरवण्याचे आणि आग लावण्याचे काम संभाजी भिडे नावाची व्यक्ती करत आहे. राष्ट्रवादीचे बडे नेते हे भिडेंचे कार्यकर्ते आहेत. योग्य वेळ आल्यानंतर त्यांची नावे जाहीर केली जातील.

Advertisement

संपादन : विनोद सूर्यवंशी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply