Take a fresh look at your lifestyle.

‘फडणवीस साहेब, मुख्यमंत्री असताना काय झोपा काढीत होता काय..’; राजू शेट्टी यांची घणाघाती टीका

सोलापूर :

Advertisement

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी आणि रविकांत तुपकर यांनी प्रचारसभेत जाऊन भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांवर कडाडून टीका केली आहे. येथील उसाच्या राजकारणाचा मुद्दा केंद्रस्थानी ठेऊन ही संघटना प्रचार करीत आहे.

Advertisement

शेट्टी यांनी भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले. ते म्हणाले की, फडणवीस आता म्हणतात की मी पाणी आणणार. पण पाच वर्षे राज्याचे मुख्यमंत्री होता त्यावेळी काय त्यांनी काय फ़क़्त झोपा काढल्या की काय? शेतकरी सुज्ञ आहेत. आता त्या भाजपवर विश्वास कोण ठेवणार? विठ्ठल आणि दामाजी कारखान्यावर जप्तीच्या कारवाईसाठी तत्कालीन साखर आयुक्तांकडून स्वाभिमानीने लेखी आदेश घेतले होते. मात्र, अजित पवार व देवेंद्र फडणीस यांच्या दबावामुळे जिल्हाधिकारी याची अंमलबजावणी अजूनही करीत नाहीत.

Advertisement

तुपकर म्हणाले की, ही निवडणूक माजलेले साखरसम्राट विरुद्ध शेतकरी अशी आहे. विठ्ठल कारखान्यावर ६०० कोटींचे कर्ज केले असून विठ्ठल व त्यानंतर दामाजी हे दोन्ही कारखाने पवारांना घ्यायचे असल्याने त्यांनी जाणीवपूर्वक भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, तलवारीच्या जोरावर जर राज्य मिळवता आले असते तर देशाचा पंतप्रधान दाऊद इब्राहिम झाला असता आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री अरुण गवळी झाला असता. किंवा पैशाच्या जोरावर निवडणुका जिंकल्या असत्या तर अंबानी आणि टाटा पंतप्रधान झाले असते.

Advertisement

संपादन : विनोद सूर्यवंशी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply