Take a fresh look at your lifestyle.

..तर दाउद पंतप्रधान आणि अरुण गवळी मुख्यमंत्री झाले नसते का..; तुपकरांनी भाजपवर केली कडाडून टीका

सोलापूर :

Advertisement

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रंगत आणली आहे. येथील लढत त्यांच्यामुळे दुरंगी-तिरंगी न होता आता थेट पंचरंगी झाली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी प्रचारसभेत जाऊन भाजपवर आणि त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांवर कडाडून टीका केली आहे.

Advertisement

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार सचिन शिंदे यांच्या प्रचारसभेत तुपकर म्हणाले की, पैसे आणि तलवारीच्या जोरावर जर राज्य मिळवता आले असते तर देशाचा पंतप्रधान दाऊद इब्राहिम झाला असता आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री अरुण गवळी झाला असता. एफआरपीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन केले. गव्हाणीत उड्या टाकल्या, त्या वेळी संत दामाजी कारखान्याचे चेअरमन समाधान आवताडे यांनी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना तलवारी दाखवल्या होत्या. पैशाच्या जोरावर निवडणुका जिंकल्या असत्या तर अंबानी आणि टाटा पंतप्रधान झाले असते. चहावाले मोदी पंतप्रधान झाले नसते.

Advertisement

ही निवडणूक माजलेले साखरसम्राट विरुद्ध शेतकरी अशी आहे. विठ्ठल कारखान्यावर ६०० कोटींचे कर्ज केले असून विठ्ठल व त्यानंतर दामाजी हे दोन्ही कारखाने पवारांना घ्यायचे असल्याने त्यांनी जाणीवपूर्वक भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली असल्याचा आरोप तुपकर यांनी केला आहे. एकूणच या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राष्ट्रवादी आणि भाजप या दोन्हींना शिंगावर घेतले आहे.

Advertisement

संपादन : विनोद सूर्यवंशी

Advertisement

(1) Facebook

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply