Take a fresh look at your lifestyle.

तुमची बँक खासगी होणार; पहिल्या टप्प्यात ‘या’ बँकांचा लागलाय नंबर..!

मुंबई :

Advertisement

केंद्र सरकारने अनेक सार्वजनिक सेवांचे खासगीकरण करण्याचा घाट घातला आहे. अर्थात त्याला मोठ्या प्रमाणात विरोध होत असला, तरी मोदी सरकार आपल्या निर्णयावर ठाम आहे. लवकरच मोदी सरकार काही बँकांचे खासगीकरण (bank privatization) करणार आहे. त्यात सुरुवातीला दोन बँकांचा नंबर लागणार आहे. सुरुवातीला खासगीकरण होणाऱ्या या दोन बँका कोणत्या आहेत, त्याचा ग्राहकांवर काय परिणाम होईल, हे जाणून घेण्यासाठी ही बातमी वाचा..

Advertisement

बँकिंग सेक्टरसाठी पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरण्याची शक्यता आहे. सरकारकडून पहिल्या टप्प्यात दोन सार्वजनिक बँकांचं खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. काही मीडिया अहवालांनुसार, बँकांच्या खासगीकरणाच्या प्रक्रियेला अंतिम स्वरुप देण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI / Reserve Bank Of India) आणि अर्थ मंत्रालयाच्या (Finance Ministry) आर्थिक सेवा आणि आर्थिक प्रकरणांच्या विभागातील अधिकाऱ्यांची 14 एप्रिल रोजी बैठक झाली. बैठकीत खासगीकरण होणाऱ्या संभाव्य बँकांबाबत चर्चा झाली. सूत्रांच्या माहितीनुसार, चार ते पाच बँकांची शिफारस नीती आयोगाने (NITI Ayog) केली होती. त्यावर बैठकीत चर्चा झाली.

Advertisement

बिझनेस स्टँडर्डच्या अहवालाच्या मते, नीती आयोगाने 4-5 बँकांची शिफारस केली आहे. बैठकीत दोन बँकांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते. खासगीकरणाच्या यादीमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra), इंडियन ओव्हरसीज बँक (Indian Overseas Bank), बँक ऑफ इंडिया (Bank Of India), सेंट्रल बँक (Central Bank) या बँकांच्या नावाची चर्चा होती. त्यापैकी पहिल्या टप्प्यात कोणत्या दोन बँकांचे खासगीकरन होणार, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

Advertisement

आतापर्यंत याबाबत कोणताही निश्चित निर्णय झालेला नाही. दरम्यान, या बँकांच्या शेअरमध्येदेखील मंगळवारी उसळी पाहायला मिळाली. BSE मधील माहितीनुसार अनेक डील्सअंतर्गत एक लाखापेक्षा अधिक शेअर्सना (Bank Share Price) बदलल्यानंतर मंगळवारी बँक ऑफ महाराष्ट्रच्या शेअर्समध्ये 15.6 टक्क्यांची उसळी पाहायला मिळाली. केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पी (Budget) अधिवेशनातच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकांचे खासगीकरण करण्याबाबत सूतोवाच केले होते. तसेच एका सरकारी विमा कंपनीचेही (Insurance Sector) लवकरच खासगीकरण केले जाणार आहे.

संपादन : सोनाली पवार

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply