Take a fresh look at your lifestyle.

पेन्शनचे टेन्शन : विदेशी गुंतवणूक वाढणार; आणि ‘असा’ होणार परिणाम..!

म्हातारपणात कामी येणारी पुंजी म्हणजे निवृत्तीवेतन अर्थात पेन्शन (pension). आयुष्याच्या उतार वयात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची सारी भिस्त पेन्शनवरच असते. मात्र, तुमच्या पेन्शनमध्ये आता काही बदल होणार आहेत. केंद्र सरकार पेन्शन सेक्टरमध्ये विदेशी गुंतवणूक (FDI / foreign direct investment) वाढविण्याचा विचार करीत आहे. तसे झाल्यास तुमच्या पेन्शनमध्ये नेमके काय बदल होतील, हे जाणून घेणे महत्वाचे आहे. तुम्ही सरकारी कर्मचारी असाल आणि तुम्हालाही पेन्शन मिळणार असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी फार महत्वाची आहे.

Advertisement

देशाची अर्थव्यवस्था (economy) बळकट करण्यासाठी, तसेच देशात विदेशी गुंतवणूक वाढवण्यासाठी केंद्र सरकार नेहमीच प्रयत्नशील असते. सध्या केंद्र सरकार पेन्शन सेक्टरमध्ये विदेशी गुंतवणूक वाढविण्याचा विचार करीत आहे. या पार्श्वभूमीवर पेन्शन सेक्टरमध्ये विदेशी गुंतवणूक वाढल्यास सामान्य पेन्शनधारकांवर त्याचा नेमका काय परिणाम होणार, असा प्रश्न सर्रास विचारला जातोय.

सध्या पेन्शन सेक्टरमध्ये 49 टक्के विदेशी गुंतवणूक करण्यास परवानगी आहे. मात्र आता हीच सीमा 74 टक्क्यांपर्यत वाढवण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. संसदेच्या येत्या अधिवेशनात केंद्र सरकार पेन्शन सेक्टरमधील विदेशी गुंतवणूक वाढवण्यासंदर्भातील विधेयक मांडू शकतं. तसे तर्क लावले जात आहेत.

Advertisement

तुमचा पगार कसा कापला जातो?
देशात एकूण 8.5 कोटी लोक NPS म्हणजेच नॅशनल पेन्शन स्किम आणि EPS म्हणजेच इम्प्लॉईज पेन्शन स्कीमसोबत जोडलेले आहेत. तर सुरुवातीला तुमचा पगार नेमका कोठे कापला जातो, हे समजून घेणं गरजेचं आहे. तुमचा कापला जाणारा पगार हा दोन भागांमध्ये विभागला जातो. एक म्हणजे प्रोव्हिडंट फंड म्हणजेच EPF, तर दुसरा हिस्सा पेन्शन फंड म्हणजेच EPS मध्ये कापला जातो. एकूण बेसिक पगारापैकी 12 टक्के रक्कम कर्मचाऱ्यातर्फे EPFमध्ये जमा होते. कंपनीकडून 3.67 टक्के रक्कम EPF मध्ये जमा केली जाते. बाकीचा 8.33 हिस्सा पेन्शन योजनेत (EPS) जमा होतो.

Advertisement

विदेशी गुंतवणुकीचा काय परिणाम होणार?
पेन्शन सेक्टरमध्ये विदेशी गुतंवणूक वाढविल्यास काय परिणाम होतील, असे प्रश्न कामगार, कर्मचाऱ्यांच्या मनात पडत आहेत. सरकार विदेशी गुंतवणुकीची मर्यादा 74 टक्क्यांपर्यंत वाढवत असेल, तर त्याचा सामान्य कर्मचाऱ्यावर प्रत्यक्ष फारसा काही परिणाम पडणार नाही. उलट विदेशी गुंतवणूक वाढल्यामुळे पेन्शन सेक्टरमध्ये काही चांगलेच बदल होतील. नव्या तांत्रिक बाबींचासुद्धा समावेश होऊ शकतो, असे गुरुग्राम येथील खासगी आर्थिक सल्लागार सीए अमित रंजन यांनी सांगितले.
संपादन : सोनाली पवार

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply