Take a fresh look at your lifestyle.

म्हणून मुख्यमंत्री योगींच्या गोरखपुरमध्ये मतदारांनी टाकला निवडणुकीवरच बहिष्कार..!

लखनौ :

Advertisement

आज सकाळी सात वाजल्यापासून गोरखपूर पंचायत निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू झालेली आहे. या भागात अनेक ठिकाणी मतदारांची नावे मतदार यादीतून गायब असल्याची प्रकरणे गावोगावी आढळली आहे. त्यामुळे वैतागलेल्या एका गावाने मतदानावरच बहिष्कार टाकला आहे.

Advertisement

गगहा या गावातील तब्बल 135 मतदारांचे नाव यादीतून गायब आहे. त्यामुळे वैतागलेल्या मतदारांनी निवडणूक प्रक्रियेवरच बहिष्कार टाकला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याच स्थानिक भागात अशी परिस्थिती असल्याने ही राष्ट्रीय बातमी बनली आहे. आज उत्तरप्रदेश राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया राबवली जात आहे.

Advertisement

मतदार यादीतून नाव गायब असलेल्या लोकांनी संपूर्ण गावाला बहिष्कार घालण्याचे आवाहन केले आहे. अनेकांनी त्यांना पाठींबा दिला आहे. तर, काहीजण चर्चा करून मतदान करायचे किंवा नाही हे ठरवणार आहेत. काहींनी मात्र, मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, यामुळे त्या भागात तणावसदृश वातावरण आहे. तसेच आगामी काळात कोणत्याही निवडणुकीत गावातील लोक मतदान करणार नाहीत, असा इशाराही येथील ग्रामस्थांनी दिला आहे. मतदार यादीतून नाव हटवण्याच्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

Advertisement

दुसरीकडे सरदारनगरच्या तेल्हनापर ग्रामपंचायतीमध्ये प्रभाग क्रमांक 1 ते 13 पर्यंत ग्रामपंचायत सदस्य निवडणुकीसाठी बॅलेट पेपरच पोहोचला नाही. त्यामुळे येथील निवडणूक प्रक्रिया थांबली आहे. त्रिस्तरीय पंचायत निवडणुकीत ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य व जिल्हा पंचायत (परिषद) सदस्य या पदासाठी गुरुवारी सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होत आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply