Take a fresh look at your lifestyle.

म्हणून वाढला करोनाचा स्प्रेडींग रेट; पहा कोणत्या ठिकाणी काय आहे परिस्थिती

पुणे :

Advertisement

करोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता सध्या सर्वांनी विशेष काळजी घेऊन व्यवहार करणे आवश्यक आहे. अशावेळी रुग्णसंख्या वाढीचा दर भयानक असल्याने अवघ्या देशभरात चिंता व्यक्त होत आहे. त्यासाठीच्या सूचना आणि सध्याच्या नियमांची सांगड घातल्यावर काही बाबी स्पष्ट होतात.

Advertisement

कोरोना संसर्ग वाढीचे एक कारण म्हणजे एंटीजन टेस्ट अवलंबून राहण्याचे प्रमाण वाढणे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीसुद्धा ज्या राज्यात आरटीपीसीआर चाचण्या तुलनेने कमी होत आहेत, तेथे कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण अत्यंत जास्त आहे. जेथे आरटीपीसीआर चाचण्या वारंवार होत असतात, तेथे हा दर तुलनेने कमी असल्याचे दिसते. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 11 सर्वाधिक राज्यांचा कोरोना रुग्णसंख्या डेटा गोळा केला आहे. त्यातून ही माहिती पुढे आली आहे.

Advertisement

या आकडेवारीनुसार महाराष्ट्र, छत्तीसगड, उत्तरप्रदेश, गुजरात, मध्यप्रदेश, दिल्ली आणि केरळ अशी राज्ये आहेत जेथे आरटीपीसीआर चाचण्या 60०% पेक्षा कमी आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आरटीपीसीआर चाचण्या किमान 70 टक्के घेण्यात याव्यात. तर, एंटीजन चाचणी फ़क़्त 30 टक्क्यांपेक्षा जास्त नसावी. त्यातही एंटीजन चाचण्या केवळ गर्दीच्या ठिकाणी स्क्रीनिंगच्या उद्देशानेच केल्या पाहिजेत.

Advertisement

मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्रात 17-23 फेब्रुवारीच्या आठवड्यात आरटीपीसीआरच्या 70 टक्के चाचण्या घेण्यात आल्या. त्यावेळी संसर्गाचा दर 8.90 टक्के होता. परंतु, त्यानंतर आरटीपीसीआर चाचण्या कमी झाल्या आणि अँटीजन चाचण्या वाढल्या. 7-13 एप्रिल या कालावधीत राज्यातील आरटीपीसीआर चाचणी टक्केवारी 57 टक्के होती आणि राज्यात स्प्रेडींग रेट 24 टक्क्यांच्या पुढे गेला.

Advertisement

छत्तीसगडमधील आरटीपीसीआर चाचणी रेटही वरील कालावधीत 35.70 टक्क्यांवरून 28.20 टक्क्यांवर घसरला. परिणामी, राज्याचा रुग्णवाढ दर 1.40 वरून 27.95 टक्क्यांवर गेला आहे. उत्तरप्रदेशमधील आरटीपीसीआर चाचणी दर 47 वरून खाली येऊन 44 टक्के झाला आहे आणि रुग्णवाढ दर 0.10 वरून 4.84 टक्क्यांवर गेला आहे. गुजरातमधील आरटीपीसीआर चाचण्या 38-42 टक्क्यांच्या दरम्यान असून रुग्णवाढ दर 1.60 वरून 4.54 टक्क्यांपर्यंत वाढला आहे.

Advertisement

आयसीएमआरच्या प्रोटोकॉल अंतर्गत एंटीजन चाचणीचा अहवाल सकारात्मक असल्यास त्यास योग्य मानले जाते. परंतु जर ती नकारात्मक असेल तर ती चुकीची मानली पाहिजे आणि त्या व्यक्तीची आरटीपीसीआर चाचणी केली पाहिजे. पण नकारात्मक अहवालाचा विचार करता राज्याने हे पाऊल उचलले नाही. यामुळे रुग्ण शोधण्यात अडचणी येऊन स्प्रेडींग रेट वाढला आहे.

Advertisement

संपादन : माधुरी सचिन चोभे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply