Take a fresh look at your lifestyle.

करोना झाल्यावर ‘अशी’ लक्षणे असल्यास तत्काळ कार्डियाेलाॅजीस्टचा सल्ला घ्याच..

सध्या करोना रुग्णसंख्या वाढत असतानाच रुग्ण बरे होऊन घरी जाण्याचा वेगही बरा आहे. मात्र, एकदा करोना होऊन आपण बरे झाल्यावर घरी गेलो की अजिबात निश्चिंत होण्याचे कारण नाही. कारण, करोना दुसऱ्यांदा जसा होऊ शकतो, तासेक इतर काही लक्षणे संबंधित रुग्णामध्ये दिसू शकतात. अशावेळी योग्य काळजी न घेतल्यास त्याचे दुष्परिणाम गंभीर असू शकतात.

Advertisement

काेराेनाच्या संसर्गामुळे शरीरात रक्ताच्या गाठी तयार होत असल्याने काेराेनातून बरे झाल्यानंतर रुग्णांना हृदयविकाराचा त्रास हाेणे, तसेच शरीराच्या वेगवेगळ्या भागात रक्तवाहिन्यांमध्ये ब्लाॅकेजची समस्या निर्माण होण्याच्या समस्या दिसतात. त्यासाठी काेराेनातून बरे झालेल्या बऱ्याच रुग्णांना रक्त पातळ हाेण्याच्या गाेळ्या दिल्या जातात. डाॅक्टरांच्या सल्ल्याविना त्या गोळ्या किंवा प्रिस्क्रिप्शनद्वारे दिलेले औषध अजिबात बंद करून नयेत. मात्र, असे लक्षण सर्रास नाही, तर फ़क़्त ५ टक्के रुग्णांना असे लक्षण दिसू शकतात.

Advertisement

दिसणारी लक्षणे अशी :

Advertisement
  • काेराेना उपचारानंतर प्रचंड अशक्तपणा
  •  चालताना अथवा बाेलताना दम लागणे
  • रक्तवाहिन्यांमध्ये गाठी तयार हाेण्याचा त्रास
  • रुग्णांच्या छातीत दुखणे, रक्तदाब कमी हाेणे अथवा वाढणे
  • स्टेनमध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार हाेणे
  • पायाच्या रक्तवाहिनीत गाठी तयार हाेणे
  • फुप्फुसात गाठी तयार हाेऊन त्याचा हृदयावर दाब पडणे
  • मेंदूत रक्ताची गुठळी तयार हाेऊन पॅरॅलिसीसचा त्रास हाेणे

ज्यांना अशी लक्षणे जाणवतात त्यांनी तातडीने कार्डियाेलाॅजीस्टचा सल्ला घेणे गरजेचे अाहे. ही लक्षणे असलेल्या रुग्णांचे प्रमाण ५ टक्के पर्यंत अाहे.

Advertisement

संपादन : विनोद सूर्यवंशी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply