Take a fresh look at your lifestyle.

संकटात भर : ‘त्यामुळे’ पाचशेपेक्षा जास्त वैद्यकीय अधिकारी नसणार कामावर..!

मुंबई :

Advertisement

देशभरात करोनाकहर जोमात आहे. त्याचवेळी राज्य शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गुरुवारपासून १५ एप्रिल रोजी चोवीस तास काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वाढत्या रुग्णसंख्येत उपचारासाठी ससेहोलपट करणाऱ्या नागरिकांच्या आणि सरकारच्या नियोजनामध्ये संकटाची भर पडणार आहे.

Advertisement

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी ७ एप्रिलपासून काळ्या फिती लावून काम सुरू ठेवले होते. मात्र, राज्य सरकारने त्याकडे अजूनही लक्ष न दिल्याने मग त्यांनी २४ तासांचे लाक्षणिक आंदोलन पुकारले आहे. कोरोनाकाळात या आंदोलनाचा मोठा फटका रुग्णसेवेला बसणार आहे. राज्यात १८ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत एकूण ५७२ वैद्यकीय अधिकारी, अधीक्षक, उपअधीक्षक अशी पदे आहेत. हे सर्व डाॅक्टर्स गुरुवारी कामावर नसतील.

Advertisement

संघटनेच्या मागण्या पुढीलप्रमाणे :

Advertisement
  • शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील वैद्यकीय अधिकाऱ्यांना कायम करण्यात यावे.
  • सातवा वेतन आयोग लागू करावा.
  • मागण्यांची सातत्याने होणारी हेळसांड पाहून हे पाऊल आम्हाला उचलावे लागत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.

दरम्यान, मागण्या मान्य न केल्यास नाइलाजास्तव २२ एप्रिलपासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा वैद्यकीय महाविद्यालय वैद्यकीय अधिकारी संघटनेने दिला आहे. ऑक्टोबर २०२० मध्येही संघटनेने आंदोलन पुकारले होते. त्यावेळी आरोग्यसेवा कोलमडली होती. आता तर आरोग्य सेवा तणावामध्ये नाही, तर खूपच महत्वाचा घटक बनलेली आहे. अशावेळी हे आंदोलन होत असल्याने आता या आंदोलनाचा फटका बसणार आहे.

Advertisement

संपादन : विनोद सूर्यवंशी

Advertisement

Advertisement

Leave a Reply