Take a fresh look at your lifestyle.

IPL 2021 : म्हणून वीरेंद्र सेहवागने अंडरटेकरचा व्हिडीओ टाकत उडवली खिल्ली..!

मुंबई :

Advertisement

शाहरुख खानच्या केकेआर संघाला मुंबईविरुद्ध लाजिरवाणा पराभवाचा सामना करावा लागला. केकेआर विजयाच्या उंबरठ्यावर असताना त्यांच्या काही चुकांमुळे मुंबईने कोलकत्याच्या हातातोंडाशी आलेला सामना हिरावून घेतला. खरं तर, केकेआर संघाने मुंबईला १५२ धावांवर रोखलं होतं पण विजयाच्या आत्मविश्वासाने केकेआरचा संघ शानदार सुरुवात करुनही १० धावांनी पराभूत झाला.

Advertisement

आता केकेआरच्या पराभवामुळे सोशल मीडियात वेगवेगळ्या प्रकारचे मिम्स तयार केले जात आहेत. येथे टीम इंडियाचा माजी तुफानी फलंदाज वीरेंद्र सेहवागनेही केकेआरच्या पराभवाचा आनंद लुटला. त्याने डब्ल्यूडब्ल्यूईचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये अंडरटेकर एका बॉक्समध्ये झोपलेला आहे. रॅन्डी ऑर्टन त्याच्यासमोर येताच अंडरटेकर अचानक त्याची मान पकडतो आणि त्याची धुलाई करतो, असा हा व्हिडीओ आहे.

Advertisement

या व्हिडिओद्वारे सेहवागला सांगायचं होतं की झोपलेल्या मुंबईच्या संघाने अखेरच्या षटकात अचानक केकेआरवर वर्चस्व गाजवलं आणि सामना जिंकला. अनेकांना सेहवागचे ट्विट आवडले आहे. उल्लेखनीय बाब ही आहे की जोपर्यंत नितीश राणा क्रीजवर होता, तोपर्यंत केकेआरचा विजय निश्चित झाल्याचे दिसत होते.

Advertisement

राहुल चहर अचानक आला आणि त्याने केकेआरचा डावाला सुरुंग लावला. चहरने ५७ धावांवर राणाला बाद केले. राणा बाद झाला तेव्हा केकेआरची धावसंख्या १५ षटकात ४ बाद १२२ होती आणि विजयासाठी संघाला ५ षटकांत केवळ ३० धावांची गरज होती. परंतु राणा बाद झाल्यानंतर केकेआरच्या संघाने तीन विकेट गमावल्या आणि त्यांना केवळ २० धावा करता आल्या. 
संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement

Virender Sehwag on Twitter: “Mumbai to Kolkata in the last 5 overs. Coming back from the dead. #MIvsKKR https://t.co/3SQsSO9vMO” / Twitter

Advertisement

Advertisement

Leave a Reply