Take a fresh look at your lifestyle.

IPL 2021 : पाकिस्तानच्या शरजीलचा ‘हा’ कारनामा जगभर फेमस; तुम्हालाही वाचून येईल हसू..!

मुंबई :
पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या टी २० मध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघ विजय झाला असून दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पाकिस्तानला ६ गडी राखून पराभूत केले. या सामन्यात पाकिस्तानचे क्षेत्ररक्षण हा सर्वत्र चर्चेचा विषय होता. विशेषत: जॉर्ज लिंडेचा झेल शरजील खानने सोडला, ज्याची बरीच चर्चा होत आहे. शरजील खानचे विनोदी व्हिडीओ सोशल मीडियावर बनवले जात आहेत. वास्तविक, शरजिलला लिंडेच्या झेलची योग्य कल्पना येऊ शकली नाही, ज्यामुळे त्याच्याकडून सोपा झेल घेण्यात गडबड झाली.

Advertisement

शरजीलने ही सोपी संधी गमावल्याचे पाहून चाहते सोशल मीडियावर हसणे थांबवू शकले नाहीत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्याचे झाले असे की, जेव्हा लिंडे फलंदाजी करीत होता तेव्हा १३ वे षटक पाकिस्तानकडून टाकले जात होते. त्याच षटकात लिंडेने लांबच्या दिशेने हवाई फटका मारला आणि तो थेट फिल्डर शरजीलच्या दिशेने लाँग ऑनवर गेला. मात्र येथे पाकिस्तानी फिल्डरने चूक केली. लिंडेने हवेत शॉट मारताच शरजील झेल घेण्यास पुढे सरसावला, पण दुर्दैवाने पाकीस्तानच्या फील्डरला बॉल कुठे गेला आहे, हे समजू शकले नाही आणि तो पुढे सरसावला. आणि चेंडू मात्र त्याच्या मागे येवून पडला. अशाप्रकारे, शरजीलने लिंडेचा साधा सोपा झेल चुकवला. सोशल मीडियावर शरजीलचा हा कारनामा चांगलाच फेमस झाला आहे.

Advertisement

दुसऱ्या टी २० मध्ये पाकिस्तानने प्रथम फलंदाजी केली आणि २० षटकांत ९ बाद १४० धावा केल्या. यामध्ये बाबर आझमने शानदार अर्धशतक झळकावले. दक्षिण आफ्रिकेकडून फिरकी गोलंदाज जॉर्ज लिंडेने ३ गडी बाद केले. याशिवाय लिझाड विल्यम्सनेही ३ गडी बाद करण्यात यश मिळविले. पाकिस्तानने दिलेले हे लक्ष्य दक्षिण आफ्रिकेच्या संघाने १४ षटकांत ४ गडी गमावून साध्य केले. ॲडम मार्करामने ५४ आणि हेन्रिक क्लासेनने २१ चेंडूत नाबाद ३६ धावा करून आपल्या संघाला शानदार विजय मिळवून दिला.
संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement

Taimoor Zaman on Twitter: “EPIC LOL 😂😂😂🤣🤣🤣 https://t.co/Q8DhsUeyh2” / Twitter

Advertisement

Advertisement

Leave a Reply